Home » महाराष्ट्र माझा » हम आपके साथ है.. – एस.एम.देशमुख.

हम आपके साथ है.. – एस.एम.देशमुख.

हम आपके साथ है.. – एस.एम.देशमुख.

– डोंगरचा राजा ॲानलाईन.

लोकांच्या बुनियादी प्रश्नांकडे लोकप्रतिनिधी जेव्हा दुर्लक्ष करतात, तेव्हा लेखणीच्या माध्यमातून आणि प्रसंगी रस्त्यावर उतरून पत्रकारांना व्यवस्थेला ़फटकारे लगवीवे लागतात.. मुंबई गोवा महामार्ग मृत्यूचा सापळा बनला होता आणि दररोज निष्पाप लोकांचे बळी जात होते.. मात्र राजकीय पक्ष मुक बधिरांच्या भूमिकेत गेल्याने कोणीच काही बोलत नव्हतं.. मग हा विषय कोकणातील पत्रकारांनी हाती घेतला आणि लेखणी आणि रस्त्यावर उतरून सतत सहा वर्षे आंदोलनं करीत सरकारला नमवलं.. आता महामार्गाचं काम पूर्णत्वास येत आहे..उदगीरच्या पत्रकारांवर देखील रस्त्यांसाठी थेट रस्त्यावर उतरायची वेळ आली आहे.

उदगीर शहरात रस्ते – रस्ते राहिलेच नाहीत.. त्याचं एका बाजुनं खड्ड्यात रूपांतर झालंय तर दुसरया बाजुनं मोठ्या प्रमाणात अतिक्रमणं झाल्यानं रस्त्यांचा श्वास गुदमरलाय.. त्यामुळे सामांन्य जनतेला रस्त्यावरून चालणं अवघड झालंय.. पत्रकारांनी त्याचं बातम्या देण्याचं काम केलं.. वरपर्यंत निवेदनं पाठविली.. उपयोग झाला नाही..राजकीय पक्षांचे हितसंबंध गुंतलेले असल्याने एकजात सारेच मौनात आहेत.. या नाजूक विषयावर काही भूमिका घ्यायची तर त्याचा थेट मतांवर परिणाम होऊ शकतो म्हणून सारेच घाबरलेले.. अशा स्थितीत सामाजिक बांधिलकी जपत आणि जनतेचे प्रश्न वेशिवर टांगणयाच्या आपल्या भूमिकेचं इमान राखत उदगीरच्या पत्रकारांनी रस्त्यावर उतरत उद्या तिरडी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.. अपेक्षा अशी आहे की, व्यवस्थेचे डोळे उघडतील.. पत्रकाराबददल अनेकांची अनेक मतं असू शकतात पण आज एका नेक कामासाठी उदगीरचे पत्रकार जर एकत्र येत रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असतील तर सामाजिक संघटनांनी देखील पत्रकारांच्या या आंदोलनात सहभागी झालं पाहिजे.. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद आणि सर्व पत्रकार उदगीरकर पत्रकारांच्या बरोबर आहेत..

तिरडी आंदोलन सकाळी 11 वाजता आंबेडकर पुतळ्या पासून सुरू होणार असून. मुक्कावार चौक, आर्य समाज, चौबारा, कॉर्नर, शिवाजी चौक येथून नपा समोरील प्रांगणात समाप्त होणार असून या आंदोलनात शहरातील, तालुक्यातील सामाजिक संघटना व जनतेनेही शामिल होऊन आपले शहर अतिक्रमण मुक्त करण्यासाठी पत्रकारांना सहकार्य करावे असे आवाहन जेष्ठ पत्रकार सुरेश पाटील नेत्रगावकर यांनी केले आहे

आता काही “शहाणी” मंडळी नाकं मुरडत म्हणू शकते की, “रस्त्यावर उतरणं हे काय पत्रकारांचं काम आहे का” ? कोकणात आम्हाला देखील अनेकदा हा सवाल केला गेला होता.. मात्र लेकहिताच्या प़श्नांवर राजकीय पक्ष उदासिन असतील आणि व्यवस्था झोपलेली असेल तर लेखणीचा आसूड करून आणि रस्त्यावर उतरून व्यवस्थेला जागं करण्याचं काम पत्रकारांनी केलं पाहिजे या मताचे आम्ही आहोत.. … उदगीरकर पत्रकार हेच काम करीत असल्याने ते अभिनंदनास पात्र ठरतात असं मत एस.एम.देशमुख यांनी व्यक्त केलं आहे..

Leave a Reply

Your email address will not be published.