Home » महाराष्ट्र माझा » जोगदंड यांचा आगार प्रमुखांनी केला सत्कार..

जोगदंड यांचा आगार प्रमुखांनी केला सत्कार..

जोगदंड यांचा आगार प्रमुखांनी केला सत्कार..

– डोंगरचा राजा / ॲानलाईन.

केज – धारूर परिवहन आगाराचे वाहक प्रतीक जोगदंड यांनी सुरक्षा सप्ताहात उत्कृष्ट सेवा बजावून आगराचे उत्पन्न वाढविल्या बद्दल त्यांचा आगार प्रमुख स्वामी व वाहतूक निरीक्षक राठोड यांनी सत्कार केला.

या बाबतची माहिती अशी की, धारूर आगराचे वाहक प्रतीक जोगदंड व त्यांचे सहकारी यांनी त्यांच्या कर्तव्य कालावधीतील बसच्या फेऱ्या दरम्यान निर्धारित लक्षा पेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक करून राज्य परिवहन मंडळाचे उत्पन्न वाढविले. दि .१८ जानेवारी ते १७ फेब्रुवारी या कालावधी राबविण्यात येत असलेल्या सुरक्षितता मोहिमे अंतर्गत उत्कृष्ट सेवा बजावणाऱ्या चालक वाचकांचा परिवहन महामंडळाच्या वतीने सत्कार करण्यात येतो. त्या अंतर्गत दि. १८ जानेवारी रोजी वाहक प्रतीक जोगदंड व त्याचे सहकारी विजय शिरढोळे व भारत राऊत यांचाही आगार प्रमुख शंकर स्वामी यांनी सत्कार केला. यावेळी वाहतूक निरीक्षक आर सी राठोड हे उपस्थित होते. या बद्दल प्रतीक जोगदंड, विजय शिरढोळे व भारत राऊत यांचा त्यांचे सहकारी चालक-वाहक आणि अधिकारी व मित्र यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
——————————————–

Leave a Reply

Your email address will not be published.