Home » माझी वडवणी » रोटरी क्लबचा स्तुत्य उपक्रम – एस.एम.देशमुख.

रोटरी क्लबचा स्तुत्य उपक्रम – एस.एम.देशमुख.

रोटरी क्लबचा स्तुत्य उपक्रम – एस.एम.देशमुख.

– वडवणीत पत्रकारांचे आरोग्य तपासणी शिबीर संपन्न.

वडवणी – कोरोना महामारीच्या काळात पत्रकारांनी जिवाची पर्वा न करता समाजात जनजागृतीचे काम केलेले आहे त्यामुळे पत्रकार हि कोरोना योध्दा आहे तरी या पत्रकारांचे आरोग्य चांगले राहावे याकरिता वडवणी रोटरी क्लबचा हा उपक्रम स्तुत्य असल्याचे वडवणी येथील दर्पण दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या पत्रकारांच्या आरोग्य तपासणी शिबिराच्या वेळी बोलताना मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी व्यक्त केले.
वडवणी रोटरी क्लबच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त काल दि.7 जानेवारी रोजी वडवणी येथे मोफत पत्रकार आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन मयुरेश्वर हाँस्पिटल येथे करण्यात आले होते यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. विजयकुमार निपटे तर उदघाटक म्हणून एस.एम.देशमुख तर प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार सय्यद कलीम तर प्रोजेक्ट चेअरमन डॉ. देवेंद्र थोटे, प्रोजेक्ट को.चे.किसन माने,सुशेन महाराज नाईकवाडे उपस्थित होते यावेळी प्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच यावेळी पत्रकारांचा दर्पण दिनानिमित्त सत्कार करण्यात आला यावेळी प्रस्ताविक डॉ. निपटे यांनी केले तसेच यावेळी बोलताना देशमुख म्हणाले की रोटरी हि जागतिक सामाजिक संघटना असुन यामध्ये वडवणी रोटरी क्लब हि नेहमी सामाजिक उपक्रम राबवत असतात तरी पत्रकारांचे आयुष्य हे धकाधकीचे आयुष्य असुन पत्रकार हा समाजातील चांगल्या, वाईट गोष्टी या बातम्याच्या माध्यमातून समाजा समोर मांडुन जनजागृती करत असतो तरी पत्रकारांच्या कार्याची दखल ही वडवणी रोटरी क्लबने घेतलेली असुन पत्रकारांचे आरोग्य निरोगी राहावे यासाठी मोफत आरोग्य तपासणी राबविण्यात आले हा रोटरी क्लबचा स्तुती करण्या सारखा उपक्रम आहे तरी यावेळी डॉ.जगदीश टकले, डॉ. निपटे,डॉ. रवींद्र मुंडे,डॉ.गाडे यासह इतर डाक्टरांनी पत्रकारांच्या आरोग्य तपासणी केल्या तरी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रोटरी क्लब वडवणीचे अध्यक्ष डॉ. विजयकुमार निपटे, सचिव माधव पुरी,डॉ. देवेंद्र थोटे,अँड.श्रीराम लंगे, डॉ. रवींद्र मुंडे,किसन माने,सुदामराव शिंदे, सचिन आंडील, प्रा.भालेराव, वचिष्ठ शेंडगे, सुनील कुलकर्णी, भाऊसाहेब नवले, गोरख आळणे यासह सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले यावेळी पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अँड. श्रीराम लंगे यांनी केले तर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

Leave a Reply

Your email address will not be published.