Home » माझी वडवणी » तर आघाडी करू नसता सतरा जागा लढू – दादासाहेब मुंडे.

तर आघाडी करू नसता सतरा जागा लढू – दादासाहेब मुंडे.

तर आघाडी करू नसता सतरा जागा लढू – दादासाहेब मुंडे.

– डोंगरचा राजा / ॲानलाईन.

– वडवणी शहरात काँग्रेसच्या बैठकीत झाला निर्णय.

वडवणी – आगामी काळात होऊ घातलेल्या वडवणी नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी निवडणुकी साठी लागणारे तयारी सुरू केली आहे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने वडवणी नगरपंचायत मध्ये प्रथमच निवडणूक लढवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे . राज्यपातळीवर महाविकास आघाडीच्या ठरलेल्या धोरणानुसार जर मित्र पक्षातल्या मोठ्या पक्षाने काँग्रेसचा सन्मान केला तर आघाडीत करू नसता नगरपंचायतीच्या 17 जागा लढू असा निर्णय आज वडवणी झालेल्या काँग्रेस कमिटीच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस दादासाहेब मुंडे यांनी दिली आहे .. बीड जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला गेल्या अनेक वर्षापासून शक्ती देणारा एक मतदार वर्ग आहे स्थानिक पातळीवर नेतृत्व करणाऱ्या नेत्यांनी ठरवले तर काँग्रेस पक्षाच्या पंजा निशाणी ला प्रचंड मते देण्याची परंपरा बीड जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षापासून होती गेल्या काही वर्षात आघाडीच्या राजकारणात विधानसभा व लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या वाट्याला एकही जागा येत नसल्यामुळे काँग्रेस पक्षाचे निवडणूक चिन्ह असलेला पंजा गेल्या काही दिवसात मतपत्रिकेवर दिसला नाही परिणामी काँग्रेस पक्षाची संघटनात्मक बांधणी करण्यासाठी अडचणी येऊ लागल्या आहेत या पार्श्वभूमीवर स्थानिक पातळीवरच्या सर्व निवडणूक लढवण्याचा निर्णय काँग्रेस पक्षाच्या प्रदेश पातळीवरच्या नेतृत्वाने घेतला आहे . राज्यात सध्या महा विकास आघाडीचे सरकार आहे राष्ट्रवादी शिवसेना व काँग्रेस या तिन्ही पक्षांनी संयुक्तपणे सरकार बनवत असताना स्थानिक पातळीवरच्या निवडणुकीतही आघाडी करण्याचा निर्णय घेतलेला आहे .प्रत्येक मतदारसंघात आघाडीतील ज्या पक्षाचा आमदार आहे त्यांना एकूण वाटा 60 टक्के तर इतर मित्रपक्षाला 20% चा वाटा देण्याची आघाडीची घोषणा आहे . त्यानुसार जर नगरपंचायतीच्या निवडणुकीत भूमिका घेण्यात आली तर आघाडीसाठी काम करणे आमच्यासाठी स्वागत हार्य आहे मात्र स्थानिक नेतृत्वाच्या काही अडचणी झाल्या व काँग्रेस पक्षाला सन्मानजनक संधी मिळाली नाही तर वडवणी नगर पंचायतीची निवडणूक काँग्रेस पक्ष स्वतंत्रपणे लढेल गावाच्या राजकारणात प्रत्येक वार्डात उभा राहण्यासाठी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता तयार आहे या निवडणुकीचा फायदा आम्हाला आमच्या संघटनात्मक बांधणीसाठी करून घेता येईल कार्यकर्त्याचे यानिमित्ताने लोकांमध्ये जाणे होईल पक्षाचा झेंडा पक्षाचे चिन्ह व पक्षाचा नेता प्रत्येक घरापर्यंत घेऊन जाण्याचा संकल्प आम्ही केला आहे .काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात साहेब बांधकाम मंत्री अशोक चव्हाण साहेब व इतर नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली वडवणी नगरपंचायत निवडणूक आम्ही लढवणार आहोत असा एकमुखी निर्णय आज वडवणीत झालेल्या काँग्रेस पक्षाच्या बैठकीत करण्यात आला या बैठकीत वडवणी तालुक्याचे अध्यक्ष पांडुरंग मस्के सय्यद दौलत उपाध्यक्ष विष्णू उजगरे ज्येष्ठ नेते शिवाजी शिंदे सतिष मस्के काँग्रेसचे शहराचे नेते तानाजी माळी ज्ञानदेव आंधळे युवा नेते विजय पवार बाबासाहेब झोडगे श्री कवचट श्री मुजमुले परमेश्वर मुंडे श्री खरात मुक्ताराम उजगरे सह सर्व तालुका कार्यकारिणीचे पदाधिकारी हजर होते यावेळी अनुसूचित जाती विभागाचे कार्याध्यक्ष दत्ता कांबळे काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष नागेश मिठे यांनीही निवडणुकीबाबत पक्षाची भूमिका मांडली …

Leave a Reply

Your email address will not be published.