Home » महाराष्ट्र माझा » पंकजाताईंचा संपूर्ण दौरा समर्पित..

पंकजाताईंचा संपूर्ण दौरा समर्पित..

पंकजाताईंचा संपूर्ण दौरा समर्पित..

– डोंगरचा राजा / ॲानलाईन.

– सर्वसामान्यांच्या सेवेत पंकजाताईंचा संपूर्ण दौरा समर्पित.

– तीच गर्दी आणि तोच उत्साह..जनतेच्या समस्यांचेही लगेचच निराकरण !*

परळी – भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांचे यश:श्री निवासस्थान नेहमी गर्दीने फुलून गेलेले असते.आज सत्ता नसताना देखील सर्वसामान्य जनतेच्या समस्यांचे निराकरण ‘यश:श्री’ बंगल्यातून होत असल्याचा प्रत्यय भेटीसाठी आलेल्या नागरिकांना आला. आजही त्यांचेकडे गर्दीचा ओढा पूर्वीप्रमाणेच कायम असून उत्साह देखील तोच आहे.

पंकजाताई मुंडे यांचे काल रात्री परळीत आगमन झाले, त्या येताच बीड,परळीसह राज्याच्या विविध जिल्ह्यातून येणारे सर्वसामान्य नागरिक त्यांच्याकडे पूर्वीसारखीच गर्दी करून आपल्या समस्या मांडत आहेत, पंकजाताई मुंडे देखील तितक्याच तत्परतेने संबंधितांना फोनद्वारे निर्देश देऊन त्यांच्या समस्या सोडवित आहेत. परळी मतदारसंघातुन येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या अडचणी मार्गी लावल्यानंतर त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी देखील त्यांनी केली.

सध्या सर्वत्र विवाह सोहळ्यांची धामधूम सुरू असल्याने आपल्या जिवाभावाच्या कार्यकर्त्यांच्या विवाह सोहळ्याना हजेरी लावून त्यांनी नववधूवरांना त्यांच्या वैवाहिक जीवनासाठी सदिच्छा आणि शुभाशिर्वाद दिले.यावेळी पंकजाताईंच्या उपस्थितीने अनेकांना त्यांच्यासोबत फोटो काढण्याचा मोह आवरला नाही आणि फोटोसाठी पंकजाताईंभोवती चाहत्यांचा गराडा झाला.दिवसभर संपूर्ण जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांचे प्रश्न मार्गी लावणे,त्यासाठी संबंधितांना सूचना देणे आणि कार्यकर्त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणे या व्यस्त दिनक्रमामुळे पंकजाताई मुंडे यांचा दिवस सर्वसामान्यांच्या सेवेत समर्पित कारणी लागला.
••••

Leave a Reply

Your email address will not be published.