Home » माझी वडवणी » वडवणी शहरात मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन.

वडवणी शहरात मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन.

वडवणी शहरात मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन.

– रामलिंग पतसंस्थेच्या दिनदर्शिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन

– दिनदर्शिकेच्या माध्यमातून रामलिंग पतसंस्थेचा कार्योल्लेख प्रत्येक घरोघरी – पत्रकार सुभाष वाव्हळ

वडवणी – काळाचा आणि वेळेचा ओघवतेपणा समजण्यासाठी दिनदर्शिका हे महत्त्वाचे साधन असते आणि याच दिनदर्शिकेच्या माध्यमातून रामलिंग पतसंस्थेने सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. या पतसंस्थेने ही दिनदर्शिका आपल्या हजारो ग्राहकांपर्यंत तर पोहोचविलीच आहे शिवाय वडवणीच्या प्रत्येक घरोघरी दिनदर्शिका पोहोचली आहे. या दिनदर्शिकेमुळे रामलिंग पतसंस्थेचा कार्योल्लेख प्रत्येक घरोघरी गेला असून प्रत्येकाला आपल्या संपूर्ण वर्षाचे नियोजन ठेवण्यास मदत होईल. असे प्रतिपादन शासकीय अधिस्विकृतीधारक ज्येष्ठ पत्रकार सुभाषराव वाव्हळ यांनी याप्रसंगी व्यक्त केले.
याबाबत अधिक माहिती अशी की, संपूर्ण मराठवाड्याच्या सहकार क्षेत्रात नामांकित असलेल्या वडवणी येथील रामलिंग नागरी सहकारी पतसंस्था म.ता.वडवणी या पतसंस्थेचा प्रत्येक सामाजिक कार्यात मोठा व लक्षवेधी असा सहभाग असतो. मोठ्या सामाजिक कार्यातून सामाजिक बांधिलकी जोपासत या पतसंस्थेने समाजात आपला आगळा-वेगळा असा आदर्श ठसा निर्माण केलेला आहे. प्रत्येक वर्षी आपल्या सर्व हजारो ग्राहकांना तसेच प्रत्येक वडवणीकराला नूतन वर्षाच्या प्रारंभी पतसंस्थेच्या वतीने दिनदर्शिकेचे वाटप करण्यात येते. यावर्षीही संपूर्ण माहितीसह उपयुक्त अशा दिनदर्शिकेचे वाटप नुकतेच करण्यात आले. यानिमित्त रामलिंग पतसंस्थेच्या सभागृहात प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत दिनदर्शिकेच्या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या दिनदर्शिकेचे प्रकाशन ह.भ.प.प.पु.नवनाथ महाराज चिनके यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून शासकीय अधिस्विकृतीधारक ज्येष्ठ पत्रकार सुभाषराव वाव्हळ, माजी पं.स.सभापती सुधीर भाऊ ढोले, विठ्ठलराव भुजबळ, रामभाऊ लोकरे, लक्ष्मणराव भंडारे, पतसंस्थेचे अध्यक्ष कचरुशेठ झाडे, उपाध्यक्ष सर्जेराव महाराज आळणे, संस्थापक अध्यक्ष हनुमंतराव डिगे, माजी अध्यक्ष नारायणराव डिगे, सर्वश्री संचालक नवनाथराव म्हेत्रे, अरुणराव गुरसाळी, सुरेशराव ढवळशंक, डॉ.पुरुषोत्तमजी डिगे, उपमन्युजी वारे, प्रमोदजी जाधव, बाबासाहेबजी मस्के, सौ.शैलजाताई अर्जुनराव भंडारे, सौ.रंजनाताई शिवाजीराव टकले, व्यवस्थापक दिगांबर गुरसाळी, शिवाजीराव टकले, अर्जुनराव भंडारे, दतात्रय पारखे, मच्छिंद्रनाथ झाडे, गणेश टकले, विष्णुपंत पंधारे, गंगाधर कुरकुटे, बाळू डिगे, भिमराव भंडारे, राजेभाऊ बोत्रे, सचिन म्हेत्रे, ईश्वर ढवळशंक, राहूल बागडे, अविनाश वाव्हळ, लखन टिकुळे यांसह इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी सर्वप्रथम उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते श्री.चौंडेश्वरी मातेच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर ह.भ.प.प.पु.नवनाथ महाराज चिनके यांच्यासह इतर मान्यवरांच्या शुभहस्ते दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले व नंतर लागलीच दिनदर्शिकेच्या वाटपास सुरुवात करण्यात आली. यावेळी अनेक मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पतसंस्थेचे अध्यक्ष कचरुशेठ झाडे यांनी केले तर सूत्रसंचालन व शेवटी सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार व्यवस्थापक दिगांबर गुरसाळी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रामलिंग नागरी सहकारी पतसंस्थेच्या सर्व कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published.