Home » माझा बीड जिल्हा » देवडीत मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांची प्रमुख उपस्थिती राहणार..

देवडीत मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांची प्रमुख उपस्थिती राहणार..

देवडीत मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांची प्रमुख उपस्थिती राहणार..

– डोंगरचा राजा / ॲानलाईन.

– पत्रकार दिन आणि वृक्षांना मान्यवर
पत्रकारांची नावं देण्याचा देवडीत अभिनव कार्यक्रम
आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या
अर्धाकृती पुतळ्याचेही होणार अनावरण

बीड – मराठीतील मान्यवर संपादक, पत्रकारांचे कायम स्मरण राहावे यासाठी त्यांची नावं वृक्षांना देण्याचा अभिनव उपक्रम बीड जिल्हयातील देवडी येथे आयोजित करण्यात आला आहे.. 6 जानेवारी रोजी म्हणजे पत्रकार दिनी “पत्रकार दिन” आणि “वृक्ष नामकरण सोहळा” असा हा संयुक्त कार्यक्रम होत आहे.. झाडांना दिवंगत पत्रकारांची नावं देण्याचा हा उपक़म राज्यातीलच नव्हे तर देशातील पहिलाच असल्याची माहिती मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस.एम.देशमुख यांनी दिली आहे..
एस.एम.देशमुख यांनी आपल्या शेतात दोन वर्षांपूर्वी 200 झाडं लावली होती.. ही झाडं आता चांगलीच बहरली आहेत.. एस.एम.देशमुख यांनी राज्यातील पत्रकारांसाठी भरीव कार्य केले.. ज्या व्यवसायात आपण आयुष्य व्यतीत केले.. त्या व्यवसायातील मान्यवर संपादक, पत्रकारांचे चिरंतन स्मारक आपल्या गावात व्हावे अशी एस.एम.देशमुख यांची जुनी इच्छा होती.. त्यातूनच आपल्या शेतातील झाडांना मान्यवर पत्रकारांची नावं देऊन त्यांच्या स्मृती जतन करण्याची कल्पना त्यांना सूचली…मुख्य रस्त्याला लागून एस.एम.देशमुख यांचा 28 एकरचा फार्म आहे.. त्यामुळे रस्त्यावरून जाणारयांना पत्रकारांची ही नावं कायम वाचता येणार आहेत.. बीड जिल्हा मराठी पत्रकार परिषद आणि वडवणी तालुका मराठी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून एस.एम.देशमुख यांचे नामकरणाचे स्वप्न आता प्रत्यक्षात येत आहे..या कार्यक़मास बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. अजित कुंभार प़मुख पाहुणे म्हणून उपस्थित राहात असून चंपावतीपत्र चे संपादक नामदेवराव क्षीरसागर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत..
मराठी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष शरद पाबळे, पुणे विभागीय सचिव बापुसाहेब गोरे हे परिषदेचे पदाधिकारी कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहणार आहेत..सकाळी 11 वाजता एस.एम.देशमुख यांच्या वडवणी तालुक्यातील देवडी येथील फार्मवर हा कार्यक़म होईल..
यावेळी आद्य पत्रकार, दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे.. हा पुतळा धारूर येथील तरूण शिल्पकार सुधीर उमाप यांनी तयार केला आहे.. जिल्हयातील काही मान्यवर पत्रकारांचा आणि गावातील काही आदर्श शेतकरयांचा सन्मान केला जाणार आहे..
वृक्ष नामकरण आणि एका छोट्या खेड्यात जिल्हयातील मुख्य पत्रकार दिन साजरा करून बाळशास्त्री जांभेकरांना अभिवादन करण्याचा हा उपक्रम कौतुकास्पद असल्याची भावना पत्रकार व्यक्त करीत आहेत..
कार्यक़मास पत्रकारांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन बीड जिल्हा मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष सुभाष चौरे, वडवणी तालुका मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष विनायक जाधव आणि मराठी पत्रकार परिषदेचे कार्यकारिणी सदस्य अनिल वाघमारे यांनी केलं आहे..

Leave a Reply

Your email address will not be published.