डिव्हायडर झाले भित्तीपत्रक – अँड.अजित देशमुख
– डोंगरचा राजा / ॲानलाईन
बीड – बीड शहरातून जाणाऱ्या नगर महामार्गावर बांधकाम विभागाने डिव्हायडर केले. मात्र या डीवाईडर लावलेली झाडे मोठ्या प्रमाणात नष्ट झाली असून नगरपालिकेने आता डिव्हायडरच्या भिंतीवर स्वच्छ बीड, सुंदर बीड, हरित बीड, थुंकू नका, लिहिले आहे. हे डीवाईडर आता भीती पत्रकाचे काम करत आहेत. नगरपालिकेने ताबडतोब झाडे लावून सुशोभीकरण करावे, अशी मागणी जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित एम. देशमुख यांनी केले आहे.
नगरपालिकेच्या हद्दीमध्ये डीवाईडर वर झाडे लावून सुशोभीकरण करण्यात आले होते. मात्र ही झाडे वाळून गेली आहेत. विशेष म्हणजे ही झाडे वाचवण्याची जबाबदारी ज्यांच्यावर होती, त्यांनी नेमकी काय भूमिका पार पाडली ? हे समजत नाही.
झाडे लावणे, ही झाडे जगवने, या झाडांना पाणी घालणे, ही कामे कोणी करावीत हे नगरपालिकेने हे ठरवलेले आहे. यावर जर बिल उचलले गेले असेल तर ते चुकीचे आहे. सुशोभित शहर दिसण्यासाठी ही झाडे जगली पाहिजेत आणि वाढवली पाहिजे.
नगरपरिषदेने मध्ये तात्काळ झाडे लावावीत. त्याची देखभाल करावी. आणि ज्यांनी कोणी या झाडाकडे लक्ष दिले नाही. त्यांच्यावर कारवाई देखील करावी. त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी झाडे अस्तित्वात आहेत. त्याची छाटणी वेळेवर करून ती झाडे जपावीत, असे आवाहन अँड. देशमुख यांनी केले आहे.