Home » ब्रेकिंग न्यूज » तर आम्ही जाळणार – बी.एम.पवार

तर आम्ही जाळणार – बी.एम.पवार

तर आम्ही जाळणार – बी.एम.पवार

– डोंगरचा राजा / ॲानलाईन.

– भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करणाऱ्या SBI बॅंकेच्या दिनदर्शिकेचे वितरण झाले तर आम्ही जाळणार – बी एम पवार
वडवणी – भारतीय रिझर्व्ह बॅंकेच्या स्थापनेसाठी आपले आयुष्य वेचणारे आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्म दिनाचा विसर पडलेल्याSBI ने दिनदर्शिका तात्काळ परत घ्याव्यात यदा कदाचित दिनदर्शिका वितरीत केल्या तर बॅंकेत घुसून दिनदर्शिका जाळणार आहोत असा इशारा सेवालाल सेना संस्थापक अध्यक्ष बी एम पवार यांनी दिला आहे.
या संदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात बी एम पवार यांनी म्हटले आहे की, SBI बॅंकेने २०२१ चे दिनदर्शिका काढले आहेत. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त देशात आणि परदेशात सुद्धा उत्साहात साजरी केली जाते, एवढेच काय तर प्रत्येक दिनदर्शिकेवर बाबासाहेबांच्या जयंतीचा उल्लेख केला जातो. देशभरात शासकीय सुट्टी दिली जाते. देशातील आणि परदेशातील बाबासाहेबांचे शिष्य नतमस्तक होऊन अभिवादन करतात.
भारतीय रिझर्व्ह बॅंकेच्या स्थापनेसाठी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे फार मोठे योगदान आहे, त्यांच्या संकल्पनेतून याची स्थापना करण्यात आली आहे. परंतु आता या बॅंकेच्या अधिकारी लोकांना याचा विसर पडला आहे असे वाटत आहे.भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार असताना जर बॅंकेच्या अधिकारी मंडळी कडून एवढी मोठी चुक होणे ही खूप गंभीर बाब आहे.
SBI ने ही जाणिवपूर्वक चुक केली असून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करण्याच्या उद्देशाने आखलेले षडयंत्र असुन देशातील ओबीसी आणि भटके विमुक्त व बहुजन समाजाला अपमाणित करण्यासाठी उचललेले हे पाऊल आहेत.
SBI ने प्रकाशित केलेले ही दिनदर्शिका तात्काळ परत घ्याव्यात आणि दुसरी दिनदर्शिका प्रकाशित करावे, नवीन वर्षात या जर दिनदर्शिका जर बॅंकेत लागल्या तर बॅंकेत घुसून या दिनदर्शिकेचे दहन केले जाईल असा इशारा सेवालाल सेना संस्थापक अध्यक्ष बी एम पवार यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.