Home » माझी वडवणी » वडवणी तालुका प्रमुखपदी ओमराजे जाधव यांची निवड.

वडवणी तालुका प्रमुखपदी ओमराजे जाधव यांची निवड.

वडवणी तालुका प्रमुखपदी ओमराजे जाधव यांची निवड.

– डोंगरचा राजा / आँनलाईन.

– स्व.बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वडवणी तालुका प्रमुखपदी ओमराजे जाधव यांची निवड.

वडवणी – शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री मा.ना.उध्दव ठाकरे, युवा सेना प्रमुख मा.ना.आदित्य ठाकरे, यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शिवसेना नेते, राज्याचे नगरविकास मंत्री मा.एकनाथ शिंदे, आणि खा.डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सुचनेनुसार स्व.बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष महाराष्ट्र राज्याच्या वडवणी तालुका प्रमुख पदि मा.मंगेश चिवटे कक्ष प्रमुख शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष यांनी एकनिष्ठ शिवसैनिक ओमराजे जाधव यांची वडवणी तालुका प्रमुख पदी तर विजयराज काटे यांची बीड तालुका प्रमुखपदी नियुक्ती पत्र देऊन निवड केली आहे.
महाविकास आघाडी सरकारने राज्यातील गोरगरीब जनतेला मोफत व स्वस्तात वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी मुख्यमंत्री मा.ना.उध्दव ठाकरे यांनी स्व.बाळासाहेब ठाकरे शिवसेना मदत कक्षाची स्थापना केलेली आहे तरी या योजनेतंर्गत गोरगरीब,गरजु,आर्थिक दुर्बल घटकातील रूग्णांना धर्मादाय रूग्णालयात राखीव बेड उपलब्ध करून देणे, निकषात बसत असलेल्या गरिब रूग्णांवर पुर्णतः मोफत किंवा सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया करण्या संदर्भातील मदत तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजनेतंर्गत नोंदणी असलेल्या रूग्णांलयामध्ये शस्त्रक्रिया मोफत करणे, तसेच गंभीर, महागड्या शस्त्रक्रिया आवश्यक असणाऱ्या गोरगरीब गरजुं रूग्णांना भरीव अर्थसहाय्य मिळावे याकरिता पंतप्रधान वैद्यकीय सहाय्यता निधी, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी,श्री.सिध्दीविनायक ट्रस्ट, टाटा ट्रस्ट यासह विविध ट्रस्टच्या माध्यमातून आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी मदत केली जाते तरी या सर्व सुविधा गरजुवंतांना मिळवून देण्यासाठी स्व.बाळासाहेब ठाकरे शिवसेना मदत कक्षाच्या वडवणी तालुका प्रमुखपदी मा.ना.एकनाथ शिंदे व खा.डॉ. श्रीकांत शिंदे यांचे एकनिष्ठ शिवसैनिक ओमराजे जाधव यांची वडवणी तालुका प्रमुख पदी व विजयराज काटे यांची बीड तालुका प्रमुखपदी मंगेश चिवटे कक्ष प्रमुख शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष यांनी नुकतीच नियुक्तीपत्र देऊन निवड केली आहे. तरी बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील साळींबा या गावातील ओमराजे जाधव या एकनिष्ठ शिवसैनिकाची निवड करून न्याय दिला आहे.जाधव यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.