Home » माझा बीड जिल्हा » एफआरपी पेक्षा जादा भाव देणार – चेअरमन धैर्यशील सोळंके

एफआरपी पेक्षा जादा भाव देणार – चेअरमन धैर्यशील सोळंके

एफआरपी पेक्षा जादा भाव देणार – चेअरमन धैर्यशील सोळंके

– डोंगरचा राजा / आँनलाईन.

चालू गळीत हंगाम २०२० – २०२१ करिता गावात असलेल्या ऊसाची एफ आर पी पेक्षा निश्चित जादा ऊस भाव देणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन श्री धैर्यशील सोळंके यांनी दिली.

या संदर्भात अधिक माहिती देताना ते म्हणाले की सन २०२० – २१ चा गळीत हंगाम सुरू झालेला असून आज दिनांक 16 12 2020 अखेर 49 गावात दिवसांमध्ये २३५७०० मेट्रिक टन उसाचे गाळप करून 9.4 टक्के सरासरी साखर उता-याने १५४३५० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. आपले कारखान्याने मागील वेळोवेळी चे गळीत हंगामात गाळपास आलेल्या ऊसासाठी ऊस उत्पादकांचे आर्थिक हित विचारात घेऊन उच्चांकी असा दर अदा केलेला आहे.कारखान्याचे मार्गदर्शक आ. प्रकाश सोळंके यांचे मार्गदर्शनाखाली कारखाना व्यवस्थापनाने निर्णय घेऊन गळीत हंगाम 2017 – 18 मध्ये एफ आर पी प्रति मेट्रिक टन रुपये १७८७ असताना प्रति मेट्रिक टन रुपये 2000 हंगाम 2018 – 2019 मध्ये एफ आर पी प्रति मेट्रिक टन 1796 असताना प्रति मेट्रिक टन रुपये 2300 तर हंगाम 2019 20 मध्ये एफ आर पी रुपये 2259 असताना प्रति मेट्रिक टन 2500 असा उच्चांकी ऊस दर उत्पादकांना अदा केलेला आहे.
चालू गळीत हंगाम 2020 – 2021 करिता केंद्र शासनाने रास्त व किफायतशीर एआरपी प्रति मेट्रिक टन रुपये 1971.00 दिलेला असून कारखान्याने 30 नोव्हेंबर 2020 अखेर गाळपासाठी आलेल्या ऊसासाठी तूर्त पहिला हप्ता म्हणून प्रती मेट्रिक टन रुपये 1600 प्रमाणे ऊसउत्पादकांना अदा केलेला आहे. कारखान्याची मागील परंपरा पाहता कारखाना चालू हंगामासाठी वरील एफआरपीपेक्षा निश्चितच जादा ऊस भाव देणार आहे. त्यामुळे आपला ऊस या कारखान्यास गाळपास देऊन या हंगामातील कारखान्याचे 10.00 लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्व ऊस उत्पादकांनी सहकार्य करावे. असे आवाहन चेअरमन श्री.धैर्यशिल सोळंके यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.