Home » माझा बीड जिल्हा » शासनाची स्थगिती -अँड.अजित देशमुख.

शासनाची स्थगिती -अँड.अजित देशमुख.

शासनाची स्थगिती -अँड.अजित देशमुख.

– डोंगरचा राजा / आँनलाईन.

– वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एक मध्ये रूपांतरित करण्यास शासनाची स्थगिती – अँड. अजित देशमुख

बीड – शासनाने भाडेपट्ट्याने अथवा कब्जा हक्काने प्रदान केलेल्या शासकीय जमिनींचे भोगवटदार वर्ग एक मध्ये रूपांतर करण्यास मान्यता दिली होती. मात्र यावर गदारोळ झाल्याने शासनाने पुढील आदेश होईपर्यंत या कार्यवाहीस स्थगिती दिली आहे. त्यामुळे आता या जमिनी हस्तांतरित होणार नाहीत. त्या प्रतिबंधित मालकीतच राहतील, अशी माहिती जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित एम. देशमुख यांनी दिली आहे.

याबाबत शासनाने राज्यातील सर्व विभागीय आयुक्त आणि सर्व जिल्हाधिकारी यांना दिनांक १० डिसेंबर २०२० रोजी शासन आदेश काढून स्थगिती आदेश दिले आहेत. स्थगिती आदेशाची अंमलबजावणी तात्काळ करण्याचे आदेश असल्याने संबंधित खात्यांना हे आदेश लगेच बजावण्यात आले आहेत.

दिनांक ८ मार्च २०२० रोजी शासनाने अधिसूचना काढून प्रदान करण्यात आलेल्या शासकीय जमिनींचा धारणाधिकार रूपांतरित करण्याबाबत परवानगी दिली होती. मात्र यात प्रचंड गैरप्रकार होत असल्याचे प्रकार वारंवार उघडकीस येत होते. त्यामुळे हा मुद्दा शासनाच्या विचाराधीन होता.

आता ज्या शासकीय जमिनीचा भोगवटदार वर्ग दोन मध्ये समावेश आहे, त्या प्रतिबंधीत मालकीतच राहतील. वर्ग एक मध्ये येणार नाहीत. शासनाने भाडेपट्टा अथवा कब्जा हक्काने वहिवाटीत दिलेल्या या जमिनी आता सातबारावर प्रतिबंधित मालकीच्या राहणार आहेत.

यात गैरप्रकार होणे सध्या थांबले आहे. पण जनतेने त्याकडे लक्ष दिले तरच गैरप्रकार थांबतील. अधिकार्‍यांनीही आता या बाबी कटाक्षाने पाळाव्यात. ज्यामध्ये आदेश दिलेले आहेत, परंतु चलन भरलेले नाही, असेच सर्व चलण रोखून धरावे आणि स्थगिती आदेशाचे तंतोतंत पालन करावे. अन्यथा अशा अधिकाऱ्यांना जेलमध्ये घालण्याची मागणी करावी लागेल, असा इशाराही देशमुख यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.