Home » माझा बीड जिल्हा » १२ व १३ डिसेंबर रोजी विशेष मतदार नोंदणी.

१२ व १३ डिसेंबर रोजी विशेष मतदार नोंदणी.

१२ व १३ डिसेंबर रोजी विशेष मतदार नोंदणी मोहिम.

– डोंगरचा राजा / आँनलाईन.

बीड – भारत निवडणूक आयोगाचे निर्देशानूसार १ जानेवारी २०२० या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष पुननिरीक्षण कार्यक्रम निर्धारित केला असून,१५ जानेवारी २०२१ रोजी अंतिम मतदारयादी प्रसिध्द होणार आहे. या अनुषंगाने १२ व १३ डिसेंबर रोजी विशेष मतदार नोंदणी मोहिम आयोजित केली आहे.

जिल्हयातील सर्व मतदान केंद्रावर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी हे प्रत्येक मतदान केंद्रावर उपस्थित असतील. नागरिकांनी आपले नाव मतदार यादीत तपासण्यासाठी दि. १ जानेवारी २०२१ या अर्हता दिनांकावर आधारित प्रसिध्द करण्यात आलेली प्रारुप मतदार यादी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडे उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.

नागरिकांनी मतदार याद्यांच्या विशेष पुननिरिक्षण कार्यक्रमांतर्गत ज्या मतदारांची नावे मतदार यादीमध्ये नोंदविलेली नसतील त्यांनी दि. १२ व १३ डिसेंबर रोजी विशेष मोहिमेमध्ये फॉर्म नं.६ भरुन आपले नाव मतदार यादीमध्ये नोंदवावीत तसेच मयत मतदान अथवा अन्य मतदार संघात स्थलांतरीत होत असल्यास फॉर्म नं. ७ आणि नाव, वय, पत्ता, जन्म तारिख, फोटो ई. मध्ये दुरुस्ती असल्यास फॉर्म नं. ८भरुन मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडे जमा करावा, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.