Home » ब्रेकिंग न्यूज » भाजपच्या बातम्यांवर बहिष्कार.?

भाजपच्या बातम्यांवर बहिष्कार.?

भाजपच्या बातम्यांवर बहिष्कार.?

– डोंगरचा राजा / आँनलाईन.

– मराठी पत्रकार परिषदेकडून निषेध

– पालिकेच्या बैठकीतून बाहेर काढले :निपाणीतील पत्रकारांचा सत्ताधारी भाजपच्या बातम्यांवर बहिष्कार..

मुंबई – निपाणी नगरपालिकेच्या बैठकीतून सर्व पत्रकारांना बाहेर काढून पत्रकारांना अपमानास्पद वागणूक देणारया निपाणी नगरपालिकेतील सत्ताधारयांचा मराठी पत्रकार परिषदेने तीव़ शब्दात निषेध केला असून खासदार आणि नगराध्यक्षांनी पत्रकारांची माफी मागावी अशी मागणी परिषदेने केली आहे..
निपाणी नगरपालिकेला 160 वर्षाचा इतिहास आहे.. पालिकेची सर्वसाधारण बैठक आज बोलावण्यात आली होती.. बैठकीस नगराध्यक्ष तसेच खासदार उपस्थित होते.. बैठक सुरू होताच पत्रकारांना अपमानासपदरित्या बाहेर जाण्यास सांगितले गेले.. निपाणी परिषदेच्या इतिहासात अशी घटना प्रथमच घडत होती.. कारण पालिकेच्या प़त्येक बैठकांना पत्रकारांना बोलावण्यात येत असे आजच सत्ताधारयांना अशी काय गुप्त चर्चा करायची होती की, त्यांना पत्रकारांची अडचण झाली..याची चर्चा आज दिवसभर शहरात सुरू होती.. ? बैठकीतून बाहेर पडलेल्या निपाणीच्या सर्व स्वाभिमानी पत्रकारांनी तातडीने बैठक घेऊन झालेल्या घटनेचा तर निषेध केलाच त्याच बरोबर सत्ताधारी भाजपच्या बातम्यांवर बहिष्कार टाकण्याची रोखठोक भूमिका घेतली.. त्याबद्दल मराठी पत्रकार परिषदेने निपाणीच्या पत्रकारांचे अभिनंदन केले असून महाराष्ट्रातील संपूर्ण पत्रकार निपाणीच्या पत्रकारांच्या पाठिशी उभे राहतील असा विश्वास एस.एम.देशमुख यांनी निपाणी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष लियाकत शिरकोळी यांना फोन करून दिला आहे..
निपाणी तालुका पत्रकार संघाचे उल्लेखनिय कार्य लक्षात घेऊन मराठी पत्रकार परिषदेने नुकताच त्यांना वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कार जाहीर केला आहे..

Leave a Reply

Your email address will not be published.