Home » ब्रेकिंग न्यूज » तहसीलदार सह तलाठी,कोतवाल जाळ्यात..

तहसीलदार सह तलाठी,कोतवाल जाळ्यात..

तहसीलदार सह तलाठी,कोतवाल जाळ्यात..

– डोंगरचा राजा / आँनलाईन.

वडवणी – अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे वाळूचे ट्रॅक्टर सोडण्यासाठी लाच स्वीकारताना वडवणीचे तहसीलदारांसह तलाठी आणि कोतवाल यांना लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले. तीस हजाराची लाच घेताना लाचलुचपत विभागाच्या पथकाने तिघांना पकडले ही कारवाई बुधवारी करण्यात आली.

अवैधरित्या वाळू उत्खनन करून ती वाळू वाहून नेत असताना वडवणीच्या महसूल प्रशासनाने ट्रॅक्टर जप्त केले होते. ते ट्रॅक्टर तहसील कार्यालयाच्या आवारात लावण्यात आले ट्रॅक्टर सोडवण्यासाठी तीस हजाराची मागणी केली. ती लाच घेताना वडवणीचे तहसीलदार श्रीकिसन सांगळे,तलाठी शेजाळ,कोतवाल बिडवे या तिघांना रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई लाचलुचपत विभागाच्या अधीक्षक बाळकृष्ण हनपुडे यांनी आणि त्यांच्या पथकाने केली.या कारवाईने वडवणी तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.