Home » माझी वडवणी » वडवणी तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण जाहीर..

वडवणी तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण जाहीर..

वडवणी तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण जाहीर..

– डोंगरचा राजा / आँनलाईन.

वडवणी तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले असून कहीं खुशी कहीं गम अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

याबाबत अधिक वृत्त असे की वडवणी तालुक्यातील ३६ ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण सोडतीचा कार्यक्रम नुकताच तहसील कार्यालयाच्या सभागृहात दुपारी तीन वाजता घेण्यात आला. वडवणी तालुक्यात एकूण ३६ ग्रामपंचायत असून या सर्वच्या सर्व ग्रामपंचायत सरपंच पदाच्या सोडतीचा कार्यक्रम संपन्न झाला यामध्ये अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी कुप्पा, काडीवडगाव,बाहेगव्हाण ही तीन गावे राखीव तर हरिश्चंद्र पिंपरी, ढोरवाडी,चिंचवण हे तीन गावे अनुसूचित जाती पुरुषासाठी आरक्षित झाले आहेत. त्याचबरोबर नागरिकांचा मागासवर्गासाठी (ओबीसी) महिला राखीव मध्ये खडकी,लोनवळ बाबी,खापरवाडी, हिवरगव्हाण,तिगाव ही सहा गावे आणि नागरिकांचा मागासवर्ग पुरुषांसाठी उपळी, खळवट लिमगाव,कवडगाव, पिंपळा ही चार गावे आरक्षित करण्यात आली आहेत. सर्वसाधारण महिलांसाठी पुसरा,देवडी,दुकडेगाव,कान्हापूर, केंडेपिंपरी,रुई,चिंचाळा,साळींबा, सोन्नाखोटा, चिंचवडगाव ही दहा गावे महिलांसाठी तर सर्वसाधारण पुरुषांसाठी देवगाव,देवळा,
पिंपरखेड,मोरेवाडी,मोरवड,चिंचोटी, कोठारबन,परडी माटेगाव, चिखलबीड,पिंपळटक्का ही दहा गावे पुरुषांसाठी आरक्षित झाले आहेत.निश्चितच गेल्या अनेक वर्षापासून सरपंच पदाचे स्वप्न पाहणाऱ्या काही इच्छुक उमेदवारांचं स्वप्न भंग झाले. तर काही ठिकाणी इच्छुकांमध्ये आनंद दिसून आला. निश्चितच आरक्षण सोडतीच्या वेळी आरक्षण जाहीर होताच कहीं खुशी कहीं गम असं चित्र पाहावयास मिळाले.

Leave a Reply

Your email address will not be published.