वडवणीत मराठी पत्रकार परिषद शाखेचा उपक्रम
– डोंगरचा राजा / आँनलाईन.
वडवणी – देशातील मराठी पत्रकारांची मातृसंस्था असलेली अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद आज ३ डिसेंबर २०२० रोजी ८२ व्या वर्षात पदार्पण करीत आहे.या निमित्ताने मराठी पत्रकार परिषद तालुका शाखा वडवणी च्या वतीने व रोटरी क्लब ऑफ वडवणी च्या सहकार्याने आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,मराठी पत्रकार परिषद तालुका शाखा वडवणी च्या वतीने देशातील मराठी पत्रकारांची मातृसंस्था असलेली अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद आज ८२ व्या वर्षात पदार्पण करीत आहे.या निमित्ताने
मराठी पत्रकार परिषद तालुका शाखा वडवणी च्या वतीने व रोटरी क्लब ऑफ वडवणी च्या सहकार्याने आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.या प्रसंगी शासकीय अधिस्वीकृतीधारक जेष्ठ पत्रकार सुभाषराव वाव्हळ यांच्या हस्ते व रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. विजयकुमार निपटे,युवा नेते धनंजय मुंडे,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष बजरंग साबळे,प्राचार्य डी.डी.राऊत,जय भगवान महासंघाचे युवा जिल्हा अध्यक्ष शंकर चाटे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते भास्कर उजगरे, रोटरी क्लबचे डॉ.दिनकर बोंगाने,डाॅ.टकले,प्रसिद्ध व्याख्याते हभप सुशेन नाईकवाडे, युवा नेते सतीश मस्के,समता परिषदेचे शिंदे,अॅड शिंदे,यांच्या प्रमुख उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला.यावेळी आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन जेष्ठ पत्रकार सुभाषराव वाव्हळ यांच्या हस्ते करण्यात आले. तर रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ विजयकुमार निपटे यांच्या मयुरेश्वर हाॅस्पिटलमध्ये आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले.रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ विजयकुमार निपटे व युवा नेते धनंजय मुंडे यांनी उपस्थित पत्रकार बांधवांचे यथोचित सत्कार करुन शुभेच्छा दिल्या. यावेळी जेष्ठ पत्रकार सुभाषराव वाव्हळ, रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ विजयकुमार निपटे,मराठी पत्रकार परिषदेचे राज्य कार्यकारणी सदस्य संपादक अनिल वाघमारे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमास मराठी पत्रकार परिषदेचे राज्य कार्यकारणी सदस्य संपादक अनिल वाघमारे,पत्रकार विनायक जाधव (तालुकाअध्यक्ष),
पत्रकार सुधाकर पोटभरे (माजी अध्यक्ष),पत्रकार सतिष सोनवणे,
पत्रकार हरी पवार, पत्रकार महेश सदरे, पत्रकार शांतीनाथ जैन, पत्रकार ओमप्रकाश साबळे, पत्रकार सतिश मुजमुले, पत्रकार ओम जाधव,पत्रकार आकाश पोटभरे, पत्रकार सुर्यकांत सावंत, पत्रकार अर्जुन मुंडे, पत्रकार अंकुश गवळी, पत्रकार शेख एजाज, पत्रकार वाजेद पठाण सह आदींची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे प्रस्ताविक व आभार तालुका अध्यक्ष विनायक जाधव यांनी व्यक्त केले.