Home » ब्रेकिंग न्यूज » सावरगावात शेतक-यांना बिबट्या दिसला.

सावरगावात शेतक-यांना बिबट्या दिसला.

सावरगावात शेतक-यांना बिबट्या दिसला.

– ग्रामीण भागातील नागरिकांनी काळजी घ्यावी.

– आडचण आल्यास संपर्क साधावा – अर्जुन नाईकनवरे

माजलगाव – तालुक्यातील सावरगाव शिवारात शेतक-यांना बिबट्या दिसला असुन शेतक-यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामीण भागातील नागरिकांनी काळजी घ्यावी व काही आडचण आल्यास संपर्क साधावा असे आवाहन युवा नेते अर्जुन नाईकवरे यांनी केले आहे.
मागील आठ दिवसांपासून आष्टी तालुक्यात नरभक्षक बिबट्याने थैमान घातलेले असुन याठिकाणी वनविभागाचे कर्मचारी बिबट्याला पकडण्यासाठी प्रयत्न करत आहेत. परंतु सोमवारी तालुक्यातील सावरगाव परिसरात शेतक-यांना बिबट्याचे दर्शन झाले आहे. त्यामुळे या शेतक-यांमध्ये भितीचे वातावरण आहे. तालुक्यातील सावरगाव, पायतळवाडी, मंगरूळ क्रं. 1, मंगरूळ क्रं. 2, लिमगाव, जदिदजवळा, एकदरा, इरला, डूबा, रामपिंपळगाव, फुलेपिंपळगाव, तालखेड, श्रृंगारवाडी या गावातील नागरिकांनी सतर्क रहावे. कुठे जातांनी मोबाईलवर गाणे लावा, हातात घुंगरू बांधलेली काठी असु द्या, शेतात एकटे जावू नका आणि काही अडचण आल्यास संपर्क साधावा. दरम्यान याबाबत माजलगाव तहसिलदार वैशाली पाटील यांचेशी अर्जून नाईकनवरे यांनी संपर्क साधून वनविभागाच्या अधिका-यांना या भागांमध्ये पाहणी करण्यासंदर्भात सूचना द्याव्यात अशी मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.