Home » ब्रेकिंग न्यूज » पंकजाताई मुंडे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र.

पंकजाताई मुंडे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र.

पंकजाताई मुंडे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र.

– डोंगरचा राजा / आँनलाईन

बीड व अहमदनगर जिल्हयातील मानवी वस्ती मधील बिबट्याचे हल्ले चिंताग्रस्त आहेत. राज्य सरकारने हे हल्ले गांभीर्यपूर्वक घ्यावेत आणि ड्रोनद्वारे, नाईट व्हीजन कॅमेरे व जास्तीत जास्त पिंजरे लावून बिबटयाचा शोध घेऊन त्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी CMOMaharashtra श्री. Uddhav Thackeray व वनमंत्री Sanjay Rathod-संजय राठोड यांना आज पुन्हा पत्र पाठवून केली आहे.

बिबटयाने केलेल्या हल्ल्यात आष्टी तालुक्यातील नागनाथ गर्जे या शेतकऱ्याला आपला जीव गमवावा लागल्याची घटना ताजी असतांना आज किन्ही येथे बिबटयाने पुन्हा एकदा मानवी वस्तीवर हल्ला केला. या हल्ल्यात स्वराज भापकर (वय ९) हा मुलगा ठार झाला, या घटनेने संपूर्ण परिसरात दहशतीचे व भितीचे वातावरण पसरले आहे.

मागील एक महिन्याच्या कालावधीत पाथर्डी, अहमदनगर, बीड या भागात साधारणपणे १३ ते१४ ठिकाणी नरभक्षक बिबटयाने मानवी वस्तीत हल्ले केले असून त्यात साधारणपणे ८ (आठ) जणांचा मृत्यु झाला आहे. यासंदर्भात 24.11.2020 रोजी मुख्यमंत्री यांना सविस्तर पत्र दिलेले आहे.
••••

Leave a Reply

Your email address will not be published.