Home » ब्रेकिंग न्यूज » जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांचे आदेश.

जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांचे आदेश.

जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांचे आदेश.

– डोंगरचा राजा / आँनलाईन.

– निवडणूक मतदान प्रक्रियेमुळे जिल्ह्यात 48 तास मद्यविक्री बंद ठेवण्याचे जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांचे आदेश

बीड – जिल्हयातील पदवीधर मतदारसंघाची निवडणूक-2020 ची संपूर्ण प्रक्रीया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून राहूल रेखावार, जिल्हाधिकारी, बीड यांनी महाराष्ट्र दारुबंदी कायदा, 1949 मधील नियम 142(1) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करुन औरंगाबाद विभागाच्या पदवीधर मतदारसंघाची निवडणूक खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी महाराष्ट्र देशी मद्य नियम, 1973 चे नियम 26(1)(C)(1); महाराष्ट्र विदेशी मद्य (रोखीने खरेदी व विक्रिच्या नोंदवह्या इत्यादी) नियम, 1969 चे नियम 9A(2)(c)(1) व महाराष्ट्र ताडी (अनुज्ञप्त्या देणे) आणि ताडी (छेदणे) नियम, 1968 चे नियम 5(A)(1) मधील तदतुदीनुसार जिल्हयातील सर्व एफएल-1, एफएल-2, एफएल-3, एफएलबीआर-2, सीएल-2, सीएल-3, टीडी-1 इत्यादी सर्व प्रकारच्या अबकारी अनुज्ञप्त्या रविवार दिनांक 29 नोव्हेंबर 2020 सायंकाळी 5.00 वाजेपासून मंगळवार, दिनांक 1 डिसेंबर 2020 सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

भारत निवडणूक आयोगाने पदवीधर मतदार निवडणूकीचा कार्यक्रम दिनांक 2 नोव्हेंबर 2020 रोजी घोषित केला आहे. निवडणूक कार्यक्रम घोषित केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचार संहिता अंमलात आलेली आहे. उक्त कालावधीत सदर आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधित अनुज्ञप्ती धारकांविरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा, 1949 अन्वये कडक कारवाई करण्यात येईल, तसेच ते धारण करीत असलेली अनुज्ञप्ती कायमस्वरुपी रद्द करण्यात येईल.
*-*-*-*-*-*-*-*

Leave a Reply

Your email address will not be published.