Home » Uncategorized » सामाजिक बांधिलकीचा महायज्ञ.

सामाजिक बांधिलकीचा महायज्ञ.

सामाजिक बांधिलकीचा महायज्ञ.

– डोंगरचा राजा / आँनलाईल

– बाबरी मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त वडवणीत सामाजिक बांधिलकीचा महायज्ञ

– आज महारक्तदान शिबीर तर उद्या कोरोना योध्यांचा सन्मान.

वडवणी – माजलगाव मतदार संघाचे भाजपा युवा नेते तथा जिल्हा बँकेचे संचालक बाबरीसेठ मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त वडवणी शहरात सामाजिक बांधिलकीचा महायज्ञ आयोजित करण्यात आला असून यामध्ये आज शनिवार दि.२१ नोव्हेंबर २०२० रोजी सकाळी ठीक ९ वाजता बाबरीसेठ मुंडे मित्रमंडळ वडवणी तालुका यांच्या वतीने दरवर्षी नवा उच्चांक प्रस्थापित करणारे महारक्तदान शिबीर तर उद्या रविवार दि.२२ नोव्हेंबर २०२० रोजी सकाळी ठीक ११ वाजता अनस रजि.बहूउद्देशीय सेवाभावी संस्था वडवणी यांच्या वतीने शहरातील कोरोना योध्यांचा सन्मान सोहळा हे दोन्ही कार्यक्रम नगरपंचायत व्यापारी संकुल बाजारतळ, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक वडवणी याठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहेत. तरी याप्रसंगी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, माजलगाव मतदार संघाचे लाडके भाजपाचे युवा नेतृत्व तथा हजारो तरुणाईच्या गळ्यातील ताईत बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कार्यतत्पर संचालक बाबरीसेठ मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या स्नेहीजणांच्या वतीने सध्याचा कोरोना महामारीचा प्रादूर्भाव लक्षात घेता कोणताही थाटमाट किंवा इतर सर्व फाजील खर्चाला फाटा देत हा वाढदिवस केवळ सामाजिक उपक्रमांतून साजरा करण्याचा संकल्प त्यांनी केला होता. त्या अनुषंगाने लाडके नेतृत्व बाबरीसेठ मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त वडवणी शहरात एकप्रकारे सामाजिक बांधिलकीचा महायज्ञ आयोजित करण्यात आला असून मागील अनेक वर्षांपासून यानिमित्ताने वडवणीतील महारक्तदान शिबीराने संपूर्ण बीड जिल्ह्यात प्रत्येक वर्षी विक्रमाचा नवा उच्चांक प्रस्थापित करत आदर्शाला गवसणी घातलेली आहे. यावर्षीही कोरोनाचे भयानक सावट पसरलेले असतांनाही त्याला बाजूला सारुन हे महारक्तदान शिबीर नक्कीच नव्या विक्रमाची नोंद करेल यात तीळमात्र शंका नाही. आज शनिवार दि.२१ नोव्हेंबर २०२० रोजी सकाळी ठीक ९ वाजता बाबरीसेठ मुंडे मित्रमंडळ वडवणी तालुका यांच्या वतीने दरवर्षी नवा उच्चांक प्रस्थापित करणारे हे महारक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. तसेच उद्या रविवार दि.२२ नोव्हेंबर २०२० रोजी सकाळी ठीक ११ वाजता अनस रजि.बहूउद्देशीय सेवाभावी संस्था वडवणी यांच्या वतीने सध्याच्या कोरोना महामारीच्या संकटातून देशाला वाचविण्यासाठी अहोरात्र कार्य करणाऱ्या शहरातील कोरोना योध्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये वैद्यकीय क्षेत्रातील डॉ.बी.एम.पुर्भे, डॉ.पी.पी.नहार, डॉ.एम.ए.रौफ खान, डॉ.दोडताले, डॉ.भांगे मॅडम, डॉ.उमेश करमाळकर, डॉ.मधुकर घुबडे, डॉ.चौधरी, डॉ.तांदळे, डॉ.नाईकनवरे, डॉ.मुंडे, तालुका प्रशासनातील तहसीलदार श्रीकिशन सांगळे, नायब तहसीलदार सय्यद कलीम, पोलिस प्रशासनातील पोलिस उपनिरीक्षक जयसिंग मदनसिंग परदेशी, पोलिस कर्मचारी चंद्रकांत माळी, पोलिस कर्मचारी राम बारगजे, पत्रकारिता क्षेत्रातील डोंगरचाराजाचे संपादक अनिलराव वाघमारे, शासकीय अधिस्विकृतीधारक जेष्ठ पत्रकार सुभाषराव वाव्हळ, पत्रकार भैय्यासाहेब तांगडे, पत्रकार शेख शरीफ, पत्रकार विनायक जाधव, पत्रकार रामेश्वर गोंडे, नगरपंचायत प्रशासनातील नगराध्यक्ष राजाभाऊ आण्णा मुंडे, मुख्याधिकारी प्रशांत पाटील, सामाजिक क्षेत्रातील जेष्ठ समाजसेवक विनोदकुमार नहार, जेष्ठ समाजसेवक गणेशदेवा जोशी, जेष्ठ समाजसेवक गुलाबराव राऊत, सफाई कर्मचारी शेख आलिम, बांधकाम कामगार सय्यद सलीम यांसह अन्य मान्यवरांचा गौरव सन्मान केला जाणार आहे. हे दोन्ही कार्यक्रम नगरपंचायत व्यापारी संकुल बाजारतळ, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक वडवणी याठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहेत. तरी याप्रसंगी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.