वडवणीमध्ये मातोश्री सिलेक्शन चा भव्य शुभारंभ.
– डोंगरचा राजा / आँनलाईन.
वडवणी शहरांमध्ये चिंचवण रोडला नव्यानेच मातोश्री सिलेक्शनचा शुभारंभ नुकताच आ.प्रकाश सोळंके यांच्या हस्ते संपन्न झाला.
याबाबत अधिक माहिती अशी की, वडवणी या ठिकाणी नव्यानेच दिवाळी सणाच्या अनुषंगाने सुंदर सहकारी साखर कारखान्याचे संचालक भगवानराव लंगे व सिद्धेश्वर लगे आणि लंगे परिवारांनी नव्याने सुरू केलेल्या मातोश्री सिलेक्शन चा शुभारंभ विद्यमान आमदार प्रकाश सोळंके यांच्या हस्ते संपन्न झाला.या कार्यक्रमाच्या निमित्ताने सभापती अशोक डक ,जयसिंह सोळंके, भगवान महाराज रजपूत यांच्या सह शहर व तालुक्यातील राजकीय सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक आणि व्यवसायीक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.आलेल्या सर्व अतिथी गणांचे स्वागत सुंदर सहकारी साखर कारखान्याचे संचालक भगवानराव लंगे व सिद्धेश्वर लगे यांनी केले.तर कार्यक्रमास उपस्थित राहिलेल्या सर्वांचे आभार भोलेनाथ लंगे यांनी व्यक्त केले.