Home » राजकारण » युवा नेते बाबरी मुंडे यांचा आदेश आल्यास वार्ड क्रमांक 3 मधून निवडणूक लढवणार – सचिन सानप

युवा नेते बाबरी मुंडे यांचा आदेश आल्यास वार्ड क्रमांक 3 मधून निवडणूक लढवणार – सचिन सानप

युवा नेते बाबरी मुंडे यांचा आदेश आल्यास वार्ड क्रमांक 3 मधून निवडणूक लढवणार – सचिन सानप

– डोंगरचा राजा / आँनलाईन.

वडवणी – प्रभाग क्रमांक तीन हा सर्वसाधारणसाठी असून युवा नेते बाबरी मुंडे यांचा आदेश आल्यास आपण वार्ड क्रमांक 3 मधून निवडणूक लढवणार असल्याचे प्रतिपादन युवा नेते सचिन सानप यांनी व्यक्त केले.

वडवणी नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळीचे वातावरण आता गरमा – गरम झाले असून प्रभाग रचना आरक्षित झाल्याने अनेक इच्छुकांनी निवडणूक लढविण्यासाठी कंबर कसली आहे. प्रभाग क्रमांक तीन हा सर्वसाधारण साठी राखीव असून या प्रभागातून निवडणूक लढविण्यासाठी नवतरुणाई पुढे सरसावली असल्याचे दिसून येत आहे. गेल्या अनेक वर्षापासून युवा नेते बाबरी मुंडे यांच्या नेतृत्वाखाली सतत सामाजिक,

शैक्षणिक,धार्मिक क्षेत्रात काम करून अनेक गरजू लोकांना सहकार्य करण्याचे काम युवा नेते सचिन सानप यांनी केलेले आहे. सर्वांचे परिचित असं व्यक्तिमत्त्व म्हणून सचिन सानप यांच्याकडे पाहिलं जातं त्याच बरोबर युवा नेतृत्व बाबरी मुंडे यांचे खंदे समर्थक म्हणून त्यांची शहरात ओळख आहे.या ओळखीच्या जोरावरच जनसामान्यांच्या सेवेसाठी व त्यांना सतत सहकार्य करण्याच्या उदात्त हेतूने आपण प्रभाग क्रमांक 3 मधून निवडणूक लढविण्यास तयार असल्याचे मत युवा नेते सचिन सानप यांनी व्यक्त केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.