प्रभाग क्रमांक अकरा मध्ये आता नागेश डीगेच सक्षम – डॉ.कुरकुटे
– डोंगरचा राजा / आँनलाईन
वडवणी नगरपंचायत निवडणुकीची तयारी आता प्रत्यक्षात पहावयास मिळत आहे.त्याचाच एक भाग म्हणून प्रभाग क्रमांक अकरा मधुन नागेश डीगे यांना निवडणूकीत विजयी करण्यासाठी वाट्टेल ती किंमत मोजावी लागली तरी आता सर्व ताकदीनिशी तयारी केली असल्याचे मत या प्रभागातील मतदार डॉ. कुरकुटे यांनी व्यक्त केले आहे.
वडवणी नगरपंचायतीच्या गत पंचवार्षिक निवडणुकीत फक्त अकरा मतांनी पराभव स्विकारणा-या नागेश डीगे यांना आपण निवडून दिले नाही याचा पश्चाताप या प्रभाग क्रमांक अकरा मधील मतदारांना झाला आहे.शिवसेनेचे उमेदवार म्हणून नागेश डीगे यांनी गतवेळी निवडणूक लढविली होती.यावेळी मात्र मतदार राजा जागृत झाला आहे.धोका कोणी दिला याचा मोठा अनुभव मतदारांनी गतवेळी घेतला आहे.आपल्या हक्काच्या मानसाला पराभूत झाल्याचं पाहुण अनेक मतदार निराश तर झालेच होते.त्याही पलीकडे कांही जणांनी अन्न वर्जीले होते.हे नाकारुन चालणार नाही.आता मोठी संधी पुन्हा आली असुन आपल्या हक्काच्या मानसाला पुन्हा विजयी सलामी देण्यासाठी नागेश डीगे रणांगणात उतरून प्रभागातील जनतेच्या आशीर्वादाने निवडणुकीस सामोरे जात आहेत.या प्रभागातील युवकांची टिम आता सर्व ताकदीनिशी तयार झाली आहे.काहींही झाले तरी आपल्या हक्काचा नागेश डीगे विजयी करणार म्हणजे करणार असा आम्ही सर्वांनी निश्चय केला असल्याचे मतही डॉ.कुरकुटे यांनी व्यक्त केले आहे.