Home » ब्रेकिंग न्यूज » आमदार दादांचा आदेश आल्यास प्रभाग क्रमांक सोळा मधुन निवडणुक लढविण्यास तयार – सुरेश भोरे

आमदार दादांचा आदेश आल्यास प्रभाग क्रमांक सोळा मधुन निवडणुक लढविण्यास तयार – सुरेश भोरे

आमदार दादांचा आदेश आल्यास प्रभाग क्रमांक सोळा मधुन निवडणुक लढविण्यास तयार – सुरेश भोरे

– डोंगरचा राजा / आँनलाईन.

वडवणी नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी आपण तयारी केली असून माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार प्रकाश सोळंके यांचा आदेश आल्यास आपण नगरपंचायत निवडणुक लढण्यासाठी तयार असुन प्रभाग क्रमांक १६ मधुन नगरपंचायची निवडणूक लढविणार असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते सुरेश दादा भोरे यांनी व्यक्त केले.

वडवणी नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून या निवडणुकीसाठी अनेक इच्छुक उमेदवारांनी आपापल्या परीने नियोजन सुरू केले आहे.शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते सुरेश भोरे यांनी देखील आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने नगरपंचायत निवडणुक लढण्यासाठी तयार असल्याचे सांगितले.आमचे नेते विद्यमान आमदार प्रकाश सोळंके यांचा आदेश आमच्या साठी अंतिम आदेश असेल प्रभाग क्रमांक सोळा हा सर्वसाधारण महिला प्रवर्गा साठी आरक्षित करण्यात आला आहे. आपण शहरातील प्रभाग क्रमांक १६ मधुन निवडणूकीसाठी इच्छुक आहोत. आमदार दादांनी आम्हाला ही निवडणूक लढविण्यासाठी संधी दिल्यास आम्ही निश्र्चितच या संधीचे सोने करुन दाखवु.प्रभाग क्रमांक १६ मधील जनतेच्या सदैव हितासाठी आपण कटीबद्ध राहुन त्यांना प्रभागात सुखसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तत्पर राहु.आता प्रभाग क्रमांक १६ हा सर्वसाधारण महिला प्रवर्गा साठी राखीव आहे.त्यामुळे आपण आ.प्रकाश सोळंके यांच्या आदेशानुसार निवडणूक लढविणार असल्याचे मतही युवा नेते सुरेश दादा भोरे यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published.