डॉ.श्रीकांत शिंदे फौंडेशनकडून आर्थिक मदत.
– डोंगरचा राजा / आँनलाईन
– कोरोनामुळे निधन झालेल्या पत्रकारांच्या कुटुंबियांना डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशनकडून धनादेश सुपूर्द.
मुंबई – पत्रकारांच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभे असल्याचे प्रतिपादन राज्याचे नगरविकास तथा सार्वजनिक बांधकाम मा ना श्री एकनाथजी शिंदे यांनी आज केले. कोरोनामुळे निधन झालेल्या पत्रकारांच्या कुटुंबियांना आज डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशनकडून मदत करण्यात आली.
कोरोनाच्या संकटकाळात आपला जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या काही पत्रकारांना आपले प्राण गमवावे लागले.या खऱ्या कोविड योध्याच्या कुटुंबियांना डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशनकडून आर्थिक मदतीचे धनादेश सुपूर्द करण्यात आले. राज्याचे नगरविकास तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री मा ना श्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते मंत्रालयातील दिवंगत पत्रकारांच्या कुटुंबीयांच्या तसेच नातेवाईक उपस्थित नसलेल्या पत्रकार बांधवांचे चेक पत्रकार संघटनाच्या प्रतिनिधी कडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी मंत्रालयातील जेष्ठ पत्रकार स्व.जयंत करजवकर , News 18 लोकमतच्या मुंबई कार्यालयात काम करणारे पत्रकार स्व.विठ्ठल मांजरेकर , तसेच संभाजीनगर येथील सामनाचे पत्रकार स्व. राहुल डोलारे यांच्या कुटुंबियांना मदत करण्यात आली.
यावेळी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख श्री मंगेश चिवटे उपस्थित होते.मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी श्री. एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत.. पत्रकारांसाठी काम करणार्या मंगेश चिवटे यांना देखील देशमुख यांनी धन्यवाद दिले आहेत..