Home » ब्रेकिंग न्यूज » तिन्ही पुलांच भराव काम करण्या साठी यंत्रणा हजर..

तिन्ही पुलांच भराव काम करण्या साठी यंत्रणा हजर..

तिन्ही पुलांच भराव काम करण्या साठी यंत्रणा हजर..

– डोंगरचा राजा / आँनलाईन.

बीड – वडवणी तालुक्यातील खळवट लिमगाव येथे दि: २२/१०/२०२० रोजी शेती रस्त्यावर आवश्यक असलेली तिन्ही पूलं तुटल्याने शेतकऱ्यांचा शेतीशी सम्पर्क तुटल्याने शेतकरी माजलगाव बॅक वॉटर मधून पाण्यातून चप्पूद्वारे प्रवास करत होते, असाच प्रवास करत असताना गावातील ३ व्यक्तींचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.

सदर प्रकरणानंतर प्रशासनाने कसलीही दखल न घेतल्याने गावकऱ्यांनी खालील मागण्यासाठी २४/१०/२०२० रोजी अर्धनग्न आंदोलन वडवणी येथे केले व तरीही मागण्या मान्य न झाल्याने ग्रामस्थांनी २ नोव्हेम्बर रोजी जलसमाधी घेणार असल्याचा इशारा दिला होता, त्यानंतर पोलीस प्रशासनाने मध्यस्थी करत ग्रामस्थांची चर्चा घडवून आणली. संबंधित चर्चेनंतर प्रशासनाने मागण्या मान्य असून ग्रामस्थांनी दिलेल्या मुदतीत कार्यवाही करणार असल्याचे लेखी आश्वासन दिले होते.

काल प्रशासनाने दिलेल्या लेखी आश्वासनानंतर, आज दि: १/११/२०२० रोजी खळवट लिंबगाव येथिल शेताशी तुटलेला सम्पर्क तिन्ही पुलांचा भराव करून तात्पुरत्या स्वरूपात सुरू करण्यासाठी यंत्रणा हजर झाली व त्यासंबंधित काम चालू झाले.

पूल क्र. १ पूर्ण झाल्यावर पूल क्र २ व ३ चे काम लगोलग चालू करणार असल्याचे कळते.

आंदोलनकर्त्यांच्या मागणीप्रमाणे पीडित कुटुंबियांना २० लक्ष रुपये मदत घ्यावी या मागणीचा प्रस्ताव काल दि: ३१/१०/२०२० रात्री ८ पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावयाचे तहसीलदार सांगळे यांनी मेनी केले होते पण आतापर्यंत प्रस्तावाची प्रतिलिपी गावकर्यांना प्राप्त जाहली न्हवती.

कायमस्वरूपी पुलाच्या कामाचे survey and estimatation दिलेल्या मुदतीत म्हणजे २०/११/२०२० पर्यंत प्रशासन पूर्ण करते का ते पाहणे महत्वाचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.