Home » माझी वडवणी » समाज पोरका झाला – बी.एम.पवार

समाज पोरका झाला – बी.एम.पवार

समाज पोरका झाला – बी.एम.पवार

– डोंगरचा राजा / आँनलाईन.

– बंजारा समाजाचे धर्मगुरू डॉ.रामराम बापु महाराज यांच्या निधनामुळे समाज पोरका झाला – बी.एम.पवार

वडवणी – देशभरातील बंजारा समाजाचे धर्मगुरू आणि बाल ब्रह्मचारी असलेले संत डॉ.रामराम बापु महाराज पोहरादेवीकर यांच्या दुःखत निधनामुळे संपूर्ण बंजारा समाज बांधव पोरका झाला आहे.असे सेवालाल सेनेचे संस्थापकध्यक्ष बी.एम. पवार यांनी म्हटले आहे.
डॉ.रामराम बापु महाराज यांनी सांप्रदायिक पणा जोपासत असतानाच समाजाच्या मुळ प्रश्नाकडे लक्ष दिले.आज देशातील बंजारा समाजाची बिकट अवस्था झाली आहे.त्यात सुधारणा झाली पाहिजे यासाठी त्यांनी विशेष लक्ष दिले होते.इतर राज्यातील बंजारा समाजाला ST,SC चे आरक्षण मिळले तर महाराष्ट्रातील बंजारा समाजाला हेच आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी त्यांनी विशेष लक्ष घातले होते.एवढेच नव्हे तर या मागणीसाठी बापुंनी अनेक वेळा आंदोलन केली,तिन-तिन दिवस उपोषणे केली होती.डॉ रामराम बापु महाराज यांचे काल रात्री दहा वाजता दुःख निधन झाले,हि वार्ता देशभरात पसरली. यांच्या निधनामुळे राज्यातील आणि देशातील बंजारा समाजाचे आतोनात नुकसान झाले आहे, बापुं च्या निधनामुळे कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. धर्मगुरू डॉ.रामराव बापु महाराज यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो असे बी.एम.पवार यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.