Home » ब्रेकिंग न्यूज » वडवणीतुन एकास अटक.

वडवणीतुन एकास अटक.

वडवणीतुन एकास अटक.

– डोंगरचा राजा / आँनलाईन.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा विटंबना प्रकरणी वडवणीतुन एकास अटक.

अंबेजोगाई – तालुक्यातील बर्दापूर याठिकाणी बुधवार दिनांक 28 ऑक्टोबर च्या मध्यरात्री भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची अज्ञात माथेफिरू कडून विटंबना करण्यात आली होती. सकाळी जेव्हा ही बातमी तमाम चळवळीतील व सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांना कळली तेव्हा मोठ्या प्रमाणात जमाव पोलीस स्टेशनच्या दिशेने जमू लागला. लोकांचा रोष बर्दापूर पोलिसांच्या विरोधात होता. कारण पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर ही विटंबना झाली होती. गेल्या तीन दिवसात अनेक राजकीय, सामाजिक संघटनांनी या घटनेचा निषेध करून पोलिसांना धारेवर धरले‌. आंबेडकरी शक्तीचा वाढता दबाव लक्षात घेता पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करून आरोपींच्या मागावर पथके तयार केली. त्यानुसार आज शनिवार दिनांक 31 ऑक्‍टोबर रोजी एका आरोपीस वडवणी या ठिकाणाहून अटक करण्यात आली आहे.आरोपीला आंबेजोगाई पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून पोलिस त्याच्याकडून वेगवेगळ्या प्रकार,घटनाक्रम जाणून घेत आहेत. आरोपी हा सवर्ण समाजातील असून आरोपीला कठोर शासन करावे अशी मागणी चळवळीतील कार्यकर्त्यांनी केली आहे. तर पोलिसांनी आरोपीला अटक केल्याबद्दल कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, अंबेजोगाई तालुक्यातील बर्दापूर याठिकाणी बुधवार दिनांक 28 ऑक्टोबर रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची विटंबना मध्यरात्रीच्या दरम्यान अज्ञात माथेफिरू कडून करण्यात आली. सकाळी आठच्या दरम्यान गावातील चळवळीतील कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर संतापाचे वातावरण तयार झाले. असंख्य कार्यकर्ते त्या ठिकाणी जमू लागले. बर्दापूर – लातूर महामार्ग रस्ता रोको करून टायर जाळण्यात आले. तर महिला भगिनी देखील मोठ्या संख्येने घटनास्थळाकडे आगेकूच करू लागल्या. मोठ्या प्रमाणात जमाव जमु लागला. सोशल मीडियाच्या माध्यमातून जिल्हाभरात या घटनेवर संताप व्यक्त होऊ लागला आणि कार्यकर्ते परळी,आंबेजोगाई दिशेने येऊ लागले.पोलिस प्रशासनाच्या निषेधार्थ घोषणा दिल्या जाऊ लागल्या. घटनासुद्धा चिड येण्यासारखीच आहे.कारण पोलीस स्टेशनच्या जवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे. त्यामुळे उपस्थितीतांनी पोलिस प्रशासनाच्या धिक्कार केला. गेली तीन दिवस पोलिसांच्या निषेधाचे आणि आरोपींच्या अटकेची मागणी जोर धरू लागली. जिल्हाभरातून व महाराष्ट्रातून अनेक संघटनांचे पदाधिकारी बर्दापुर येथे येऊ लागले. पोलिसांनी आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांचा रोष पाहून तपासाची चक्रे गतिमान केले. जिल्हा पोलीस अधीक्षक आर.राजा यांनी यासाठी स्वतंत्र पथके निर्माण केले. आणि तपासाची दिशा ठरवली. त्यानुसार संशयित आरोपी निष्पन्न झाला. त्याचा माग काढत असता तो तेलगाव या ठिकाणी लपून बसल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी संशयित आरोपीस वडवणी येथुन अटक केली. ही घटना वार्‍यासारखी पसरली असंख्य कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांना पोलिसांच्या तत्परतेची दखल घेऊन त्यांचे आभार व्यक्त केले. आरोपी हा सुवर्ण समाजातील असून बर्दापूर येथील असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. पोलिसांनी आरोपी बद्दल मोठे गुप्तता पाळली आहे. तर आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी सुद्धा संयम दाखवत आरोपीच्या अटके बद्दल समाधान व्यक्त करून आरोपीला खडक शासन करावे. जेणेकरून पुन्हा कोणी अशी हिंमत करणार नाही असे ठणकावले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.