Home » ब्रेकिंग न्यूज » बंजारा समाजाचे धर्मगुरू डॉ. रामराव महाराज यांचे निधन; देशभरात शोककळा.

बंजारा समाजाचे धर्मगुरू डॉ. रामराव महाराज यांचे निधन; देशभरात शोककळा.

बंजारा समाजाचे धर्मगुरू डॉ. रामराव महाराज यांचे निधन; देशभरात शोककळा.

– डोंगरचा राजा / आँनलाईन.

मुंबई – देशभरातील बंजारा बांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या बंजारा समाजाचे धर्मगुरु संत रामराव महाराज यांचे काल 30 ऑक्टोबर रोजी रात्री उशिरा दीर्घ आजाराने निधन झाले. मुंबईतील लिलावती रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 89 वर्षांचे होते.संत रामराव महाराज हे वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी संस्थांचे प्रमुख होते.वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथील बंजारा समाजाचे धर्मगुरु डॉक्टर रामराव महाराज यांना श्वास घेण्याचा त्रास जाणवत होता. त्यामुळे त्यांना १७ ऑक्टोबरला उपचारासाठी मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र काल रात्री साडे अकराच्या सुमारास त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे देशभरातील बंजारा समाजावर शोककळा पसरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.