Home » माझी वडवणी » सौ.लोपाबाई रामप्रभू यादव यांची बिनविरोध निवड.

सौ.लोपाबाई रामप्रभू यादव यांची बिनविरोध निवड.

सौ.लोपाबाई रामप्रभू यादव यांची बिनविरोध निवड.

– डोंगरचा राजा / आँनलाईन.

पिंपळटक्का ग्रामपंचायत उपसरपंच
पदी सौ.लोपाबाई रामप्रभू यादव यांची बिनविरोध निवड.

वडवणी – पिंपळटक्का ग्रामपंचायत
च्या उपसरपंच पदाची नुकतीच निवड करण्यात आली असून या ठिकाणच्या ग्रामपंचायत सदस्या सौ.लोपाबाई रामप्रभू यादव यांनी उपसरपंच पदासाठी अर्ज सादर केला होता. त्यांच्या विरोधात एकही अर्ज आला नाही. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली आहे.त्यांच्या निवडीबद्दल त्यांचा यथोचित सन्मान,सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, वडवणी तालुक्यातील पिंपळटक्का या गावच्या ग्रामपंचायत उपसरपंच पदाची नुकतीच निवड करण्याची प्रक्रिया प्रशासनाकडून हाती घेण्यात आली होती.फॉर्म भरणे १० -३० ते १२-३० वाजता,छानणी १२-३० ते १-०० वाजता आणि फार्म परत घेणे १-०० ते १-३० वाजता व प्रत्यक्षात निवडीची प्रक्रिया २-०० वाजता सुरू करण्यात आली. उपसरपंच पदासाठी सौ.लोपाबाई रामप्रभू यादव यांचा एकमेव अर्ज आल्याने पीठासीन अधिका-यांनी त्यांची उपसरपंच पदासाठी बिनविरोध निवड जाहीर केली. माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार प्रकाश सोळंके यांच्या नेतृत्त्वाखाली येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते संतोष कदम यांनी गावांमध्ये सर्वांना सोबत घेत गाव विकासाच्या दृष्टीने महत्त्वाची भूमिका पार पाडत आहेत.उपसरपंच पदासाठी प्रशासनाच्या वतीने जी यंत्रणा राबविली त्यानुसार या निवडणूक प्रक्रियेसाठी पीठासीन अधिकारी म्हणून सरपंच सिंधुबाई रा.देशमुख तर सहायक पिठासीन अधिकारी म्हणून ग्रामविकास अधिकारी एस.एल.सानप,ग्रामसेवक अविनाश राठोड यांनी काम पाहिले तर निवडी दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस कर्मचारी श्री.माळी,श्री.बारगजे,श्री.वाघ,श्री.शेख सह आदींनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

उपसरपंच पदी सौ.लोपाबाई रामप्रभु यादव यांची बिनविरोध निवड झाल्याचे उपसरपंच पती रामप्रभु यादव यांचा यथोचित सत्कार करुन शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते संतोष कदम, पंडित यादव, राधाकिसन कदम, रामनाथ देशमुख, रामप्रभू यादव, विक्रम डोंगरे, बाबासाहेब विष्णु यादव, अनिरुद्ध यादव, बाबासाहेब निवृत्ती डोंगरे, सौ रुक्मिणी यादव,सौ संगीता गायके,सौ.सपना डोंगरे,बाबासाहेब कदम,
पांडुरंग अशोक कदम, बालासाहेब कदम (माजी.उपसरपंच),आत्माराम यादव,छगन कदम,आबा यादव,जैनुद्दीन सय्यद, पाशु पठाण, प्रभू डोंगरे,मन्मथ यादव,आप्पासाहेब यादव,वैजनाथ यादव,आबासाहेब कदम,शिवाजी कदम,पांडुरंग कदम,ज्ञानोबा क्षिरसागर,ज्ञानोबा कदम,जयराम यादव,चत्रभुज डोंगरे,किशोर
कदम,अजित कदम,सहदेव कदम,कैलास यादव,अमोल कदम,धर्मराज कदम,संदिप कदम,सुमंत कदम,गंगाराम डोंगरे,शेरखॉ पठाण,गुलाब पठाण सह आदींची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published.