भीमसैनिकांनी हजर राहावे-आकाश गायकवाड.
– डोंगरचा राजा – केज प्रतिनिधी
– उद्याच्या केज बंदमध्ये सर्व भीमसैनिकांनी हजर राहावे-आकाश गायकवाड.
केज – उद्या दि.३१ /१०/२०२० रोजी केज बंद ची हाक देण्यात आली आहे तरी सर्व भीमसैनिकांनी हजर राहावे. सदरील माहिती अशी की अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापुर येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाक्रती पुतळ्याची विटंबना झाली आहे. ज्या महामानवाने भारताला अखंड ठेवण्यासाठी भारतीय राज्यघटनेची निर्मिती करून या देशांमध्ये लोकशाही निर्माण केली आज त्याच महामानवाच्या पुतळ्याची विटंबना होत आहे. या देशांमध्ये मनुवादी वृत्तीची असणारे लोक सामाजिक सलोखा बिघडण्याची काम करत आहेत अशा या मनुवादी वृत्तीच्या लोकांना कठोर शासन करावे व त्यांना तात्काळ अटक झाली पाहीजे यासाठी उद्या दिनांक 31 ऑक्टोबर 2020 रोजी सर्वपक्षीय केज बंदची हाक देण्यात आली आहे तरी सर्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भीमसैनिकांना आव्हान करण्यात येते की उद्याच्या केज बंद मध्ये महात्मा फुलेनगर, आंबेडकर नगर व हौसिंग कॉलनी तसेच सर्व केज शहर व परिसरातील भीमसैनिकांनी सकाळी 10:00 वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे उपस्थित राहावे असे सर्वपक्षीय आव्हान भिमसैनिकांच्या वतीने आकाश गायकवाड यांनी केले आहे.