Home » ब्रेकिंग न्यूज » भाजपाला ‘मुंडे’ नावाची ऍलर्जी झालीय का ? – बाळासाहेब सानप यांचा संतप्त सवाल.!

भाजपाला ‘मुंडे’ नावाची ऍलर्जी झालीय का ? – बाळासाहेब सानप यांचा संतप्त सवाल.!

भाजपाला ‘मुंडे’ नावाची ऍलर्जी झालीय का ? – बाळासाहेब सानप यांचा संतप्त सवाल.!

– डोंगरचा राजा / आँनलाईन.

– जय भगवान महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप यांचा संतप्त सवाल !

बीड – ‘लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ रावजी मुंडे साहेब यांनी रात्रंदिवस पक्षासाठी जीव ओतून शहरापुरता मर्यादित असणाऱ्या पक्षाला खेड्यापाड्यात आणि बहुजनांच्या दारात पोहोचून विस्तारित केले; परंतु याच पक्षाला आज मात्र विविध ठिकाणी ‘मुंडे’ नावाबद्दल तिरस्कार होत असल्याचे दुर्दैवी चित्र दिसत आहे, अशी उद्विग्नता करून भाजपला साहेबांनंतर ‘मुंडे’ नावाची ‘ॲलर्जी’ झाली का..? असा संतप्त सवाल जय भगवान महासंघाचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी व्यक्त केला आहे.*
*लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या विषयी जाणीवपूर्वक अपशब्द वापरुन मुंडे घरांनावर राजकीय हल्ला जाणूनबूजून करणारे भारतीय जनता पार्टी अडचणीत आणण्याचा डाव यशस्वी होऊ दिला जाणार नाही, हे ध्यानात राहू द्या… असा इशारा जय भगवान महासंघाचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी व्यक्त केला आहे.*
*लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्यानंतर मुंडे नावाची अडचण करण्यात पक्षाने धन्यता मानली आहे का ? कुठला आणि कसला बदलला आहे? असे सवाल उपस्थित करून बाळासाहेब सानप पुढे म्हणाले, येथून पुढे सर्वसामान्य, बहुजन, समाजातील कार्यकर्ता, नेता, कर्मचारी-अधिकारी यांच्याबाबत असे अडवणुकीचे आणि दाबण्याचे प्रयत्न झाल्यास, जय भगवान महासंघाच्या वतीने राज्यभर लोकशाही मार्गाने आंदोलन करून जाब विचारला जाईल !’ असा इशारा जय भगवान महासंघाचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी दिला ..*
*’केवळ मतदानासाठीच समाजाचा वापर ?’*
………………………………….
*लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या नेतृत्वाखाली समाज एकसंघ पणे पक्षा च्या पाठीमागे राहिला; परंतु दुर्दैवाने त्यांच्यानंतर समाजाचा केवळ मतदानासाठी वापर करून कार्यकर्ते, नेत्यांना,व अधिकाऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याचे महापाप होत असल्याचे समाजधुरीण यांच्या लक्षात येत आहे. या बाबीची वेळीच दखल घेऊन भविष्यात असे प्रकार होऊ नयेत, असा गंभीर इशाराच जय भगवान महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी दिला आहे..

Leave a Reply

Your email address will not be published.