Home » महाराष्ट्र माझा » अंबासाखर ऊसाला भाव देणार – चेअरमन रमेश आडसकर.

अंबासाखर ऊसाला भाव देणार – चेअरमन रमेश आडसकर.

अंबासाखर ऊसाला भाव देणार – चेअरमन रमेश आडसकर.

– डोंगरचा राजा / आँनलाईन.

– बीड जिल्ह्यातील इतर कारखान्यांच्या बरोबरीने अंबासाखर ऊसाला भाव देणार -चेअरमन रमेश आडसकर.

– अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याच्या 35 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ.

अंबाजोगाई – ऊस उत्पादक शेतकरी सभासद,कामगार यांच्या हितासाठी व अंबासाखर ही सहकारी संस्था टिकली पाहिजे या विधायक भूमिकेतून अंबाजोगाई सहकारी साखर कारखाना नव्या जोमाने सुरु झाला आहे.पुढील काळात ऊसाचे मोठे उत्पादन होणार आहे. आशावेळी अंबासाखर सारखी संस्थाच शेतकर्‍यांच्या मदतीला धावून येणार आहे. आज गळीत हंगामास प्रारंभ झाला आहे.अंबासाखर बीड जिल्ह्यातील इतर कारखान्याच्या बरोबरीने ऊसाला भाव देईल असे सांगुन शेतकर्‍यांनी आपला ऊस अंबासाखरला द्यावा असे आवाहन कारखान्याचे चेअरमन रमेश बाबुरावजी आडसकर यांनी दिली.अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२०_२१ च्या ३५व्या गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.

 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंबाजोगाई पिपल्स बँकेचे चेअरमन राजकिशोर मोदी हे होते.तर व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून बीड जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य समितीचे माजी सभापती राजेसाहेब देशमुख माकेगावकर, केज कृ.ऊ.बाचे माजी सभापती अंकुशराव इंगळे,कारखान्याचे व्हाईस चेअरमन हाणमंतराव मोरे,केज कृ.उ.बा.चे सभापती संभाजीराव इंगळे,अंबाजोगाई कृ.उ.बा.चे उपसभापती गोविंदराव देशमुख, भाजपचे राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी,वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड.शरदअण्णा लोमटे,राहुल सोनवणे,राजेश्‍वर चव्हाण,मंगेश रांजणकर,सुनिल शिनगारे,दिलीप गुळभिले,भागवतराव नेटके,गुरू काळे, जिल्हा बँकेचे संचालक ऋषिकेश आडसकर,उपसभापती लक्ष्मीकांत लाड, अॅड बालासाहेब इंगळे, बबनराव सोळंके, हनुमंत कदम,मनोज फरके,अनंत शेंडगे, कल्याण शेप,अशोकराव शेजुळ,शिवाजी मायकर,डॉ.अशोकराव तिडके, माणिक दळवे,विजय रांजवण,उपनगराध्यक्ष बबनराव लोमटे, नगरसेवक मनोज लखेरा,नगरसेवक दिलीपराव काळे,बाळासाहेब देशमुख,अ‍ॅड.अनंतराव जगतकर,दत्तासाहेब जगताप,आबा पांडे,निलेश तट,राजपाल देशमुख,अॅड भैरवनाथ देशमुख,वसंतराव आगळे , बालासाहेब शेटे यांच्या सहित सर्व संचालकांची प्रमुख उपस्थिती होती. वर्ष २०२०_२१ च्या गळीत हंगामाचा शुभारंभ गुरूवार दि.२९ऑक्टोबर रोजी कारखान्याचे जेष्ठ संचालक प्रा.वसंतराव चव्हाण यांच्या शुभहस्ते गव्हणीचे विधीवत पुजन करुन मान्यवरांच्या हस्ते गव्हाणीत ऊसाची मोळी टाकून करण्यात आला.प्रारंभी बोलतांना चेअरमन रमेश आडसकर यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की केज,अंबाजोगाई,माजलगाव,धारूर,वडवणी या तालुक्यातून गळीत हंगामास उपस्थित सर्व ऊस उत्पादक शेतकरी, मुकादम ठेकेदार कारखान्याचे कामगार व हितचिंतक यांच्या सदिच्छा आणि शुभेच्छांच्या बळावर आणि आशिर्वादाने कारखाना सुरु करण्याचा संचालक मंडळाने निर्णय घेतला.त्यामुळे काटकसर करुन हा कारखाना चालविला जाईल. ऊस वाढीसाठी शेतकर्‍यांनी प्रयत्न करावेत कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर हा कार्यक्रम होत आहे.गतवर्षी पाऊस व ऊस नसल्याने या भागातील कारखाने बंद होते.अंबासाखर मराठवाड्यातील सर्वात जुना कारखाना आहे.कारखान्याची मशिनरी जुनी आहे.जिद्दीने हा कारखाना सुरु करण्याचा प्रयत्न आहे.मागील तीन महिन्यापासून सर्व कर्मचारी ताकदीने व जोशपूर्ण काम करीत आहेत.यावर्षी चांगला पाऊस झाल्याने कारखाना सुरु केला ही संस्था टिकवून ठेवायची आहे.कारण, बाराशे लोकानां रोजगार निर्मिती होते.ऊस उत्पादकांना न्याय मिळतो.बेरोजगारांना मदत होते.कारखाना सुरु करण्यासाठी नेहमीप्रमाणेच राजकिशोर मोदी यांनी त्यांच्या संस्थेकडून कारखान्यास मदत मिळवून दिल्याबद्दल त्यांनी मोदी व बँकेचे आभार मानले.सर्वपक्षीय व्यक्तींनी एकत्र येवून अंबासाखर कारखाना वाचविण्याची गरज आहे.मागील व विद्यमान सरकारने मदत केली आहे.कारखाना चांगला चालवून अंबाजोगाईचे नावलौकिक करण्याचा प्रयत्न करु यापूर्वी राज्य सहकारी बँकेसहित इतर सर्व बँकांचे कर्ज फेडले आहे.उर्वरित कर्ज फेडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करुन अंबासाखरला गतवैभव मिळवून देवू बीड जिल्ह्यातील इतर कारखान्यांच्या बरोबरीने किंबहूना त्यांच्यापेक्षा अधिकचा दर अंबासाखर देणार असल्याची ग्वाही चेअरमन रमेश आडसकर यांनी यावेळी दिली.
यावेळी बोलताना जि.प.चे.माजी सभापती राजेसाहेब देशमुख म्हणाले की, रमेशराव यांनी हिंमतीने कारखाना सुरु केला आहे.कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकरी हे आडसकर कुंटूबियावर प्रेम करणारे आहेत.ते अंबासाखरला ऊस देणार आहेत.पाऊस भरपूर झाल्यामुळे मांजरा धरण भरले आहे.शेतकर्‍यांनी ऊसाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली आहे.त्यामुळे आता आपला ऊस अंबासाखरला देवून या संस्थेला शेतकर्‍यांनी बळकटी द्यावी.अंबासाखर सुरु होत असल्याने अंबाजोगाई,केज व धारुर या तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकर्‍यांचे जीवनमान उंचावणार असल्याचे देशमुख म्हणाले.राहुल सोनवणे यांनी यावेळी बोलतांना सांगितले की,अंबासाखर सुरु होत असल्याने रमेश आडसकरांच्या माध्यमातून या परिसरातील विकासाला चालना मिळणार आहे.त्यामुळे शेतकर्‍यांनी आडसकरांच्या पाठीशी आपली ताकत उभी करावी अशी अपेक्षा व्यक्त केली.भाजपा प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी फक्त एका फोनवर हजारो लोक जमतात ही किमया रमेशराव यांनी कायम ठेवली आहे.कारखान्याला ५० वर्षे झाले आहेत.अंबासाखर ही मांजरा काठावरचे शेतकर्‍यांची भाकर आहे.सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येवून राजकारण बाजूला ठेवून अंबासाखर वाचविला पाहिजे.शेतकर्‍यांनी आपला ऊस अंबासाखरलाच द्यावा असे आवाहन कुलकर्णी यांनी केले. केज कृ.उ.बा.चे माजी सभापती अंकुशराव इंगळे यांनी या कारखान्याशी आपण १९८५ पासून निगडीत असल्याचे सांगुन आडसकर तात्यांनी मोठ्या कष्टाने ही संस्था टिकवली असून रमेशराव आडसकरांच्या माध्यमातून अंबासाखर गतवैभव मिळविणार असा विश्वास इंगळे यांनी व्यक्त केला.अध्यक्षीय समारोप करताना कारखान्याचे संचालक राजकिशोर मोदी यांनी यावेळी बोलताना सांगितले की,रमेशराव आडसकर हे अत्यंत काटकसरीने कारखान्याचे व्यवस्थापन करीत आहेत.गेल्या दोन महिन्यांपासून त्यांचे अथक परिश्रम सुरु आहेत.शेतकरी,कामगार यांची संस्था टिकली पाहिजे यासाठी सर्वांनी आडसकरांना अंबासाखरच्या ऊस गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन मोदी यांनी केले.या कार्यक्रमास कारखान्याचे संचालक सर्वश्री प्रा.वसंत चव्हाण,दाजीसाहेब लोमटे,नांदवटे आबा,अनंतराव पाटील,जनार्दनराव माने,वसंतराव हारे, शिवराम कदम,अजय ढगे पाटील,खुळे गुरुजी,औंदुबर शिंदे, गौतमराव चौधरी,तुळशीराम राऊत,श्रीराम मुंडे,तानाजी देशमुख,सुनील शिंदे,निवृत्ती चेवले,अॅड.प्रमोद जाधव,अशोक गायकवाड,मारूतीराव साळुंके, कार्यकारी संचालक सुरेश साखरे तसेच आगे दादा,पांडुरंग ठोंबरे,राजु मोरे,भारत सोळंके यांचेसह पञकार,असंख्य गावचे सरपंच,विविध गावांच्या सेवा सोसायट्यांचे चेअरमन,जि.प., पंचायत समिती, बाजार समिती, ग्रामपंचायत यांचे सदस्य,अधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी,लोकप्रतिनिधी,सभासद,शेतकरी,कर्मचारी यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पांडुरंग अंजान सर यांनी करून उपस्थितांचे आभार प्रेमचंद पवार यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published.