Home » ब्रेकिंग न्यूज » अन्यथा महाराष्ट्रभर आंदोलन करू – पप्पू कागदे यांचा ईशारा.

अन्यथा महाराष्ट्रभर आंदोलन करू – पप्पू कागदे यांचा ईशारा.

अन्यथा महाराष्ट्रभर आंदोलन करू – पप्पू कागदे यांचा ईशारा.

– डोंगरचा राजा / आँनलाईन.

– बर्दापुर येथील घटनेतील आरोपीना तात्काळ अटक करा; अन्यथा महाराष्ट्रभर आंदोलन करू..
– पप्पू कागदे यांचा ईशारा

बीड – महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळताची अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापुर येथील झालेली विटंबनेचा प्रकार हा निंदनीय असून आरोपीना जर तात्काळ अटक केली नाही तर आम्ही महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन करू असा ईशारा युवा रिपाइंचे प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांनी दिला आहे.

अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर येथे दि. २८ ऑक्टोबर रोजी रात्री महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची अज्ञात माथेफिरूने दगडाने नासधूस करून विटंबना केली आहे. त्यामुळे गावातील वातावरण तणावाचे बनलेे असूूून सर्व व्यवहार बंद
आहेत. पहाटे पासून भिंमसैनिक आणि महिला पोलीस स्टेशन मध्ये ठिया देऊन आंदोलन करीत आहेत.
पप्पू कागदे यांनी बर्दापूर येथे जाऊन घटनेची माहिती घेतली. या वेळी त्यांनी आमदार संजय दौंड व अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांची भेट घेतली आणि प्रशासनाला ईशारा दिला की, या घटनेची नि:पक्षपातीपणे चौकशी करून आरोपीना तात्काळ अटक करावी. जर आरोपीना तात्काळ अटक झाली नाही; तर आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र स्वरूपात आंदोलन कर. तसेच आमची भूमिका ही समतेची व समानतेची असून जे कोणी घटने मागे माथेफिरू असतील त्यांना कठोर शिक्षा करण्यात यावी. तसेच जातीय सलोखा आणि शांतता राखण्याचे आवाहनही पप्पू कागदे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.