Home » माझा बीड जिल्हा » जिल्हा न्यायालयात आरोग्य सेवा कक्षाचे उद्घाटन.

जिल्हा न्यायालयात आरोग्य सेवा कक्षाचे उद्घाटन.

जिल्हा न्यायालयात आरोग्य सेवा कक्षाचे उद्घाटन.

– डोंगरचा राजा / आँनलाईन.

बीड आज दिनांक 26 ऑक्टोबर 2020 रोजी सकाळी ठिक 11.00 वाजता जिल्हा न्यायालय, बीड येथे मा.श्री.हेमंत शं.महाजन, जिल्हा व सत्र न्यायाधीश,बीड यांच्या संकल्पनेतून जिल्हा न्यायालय, बीड येथील ईमारतीमध्ये आरोग्य सेवा कक्षाचे उद्घाटन राहूल रेखावार, जिल्हाधिकारी,बीड यांच्या हस्ते झाले. बीड जिल्हयाचे प्रमुख न्यायाधीश हेमंत शं. महाजन यांच्या संकल्पनेतून हे सेवा केंद्र आजपासून सेवेत रुजू होत आहे. जिल्हा न्यायालयातील न्यायाधीश वर्ग, कोर्टातील कर्मचारी, वकील व पक्षकार यांची वर्दळ असते त्यांना आजारी पडल्यास प्राथमिक वैद्यकीय सेवा व सल्ला मिळावा या दृष्टीकोनातून या सेवा केंद्राची सुरुवात झाली. ज्यास जिल्हा शल्यचिकित्सक अशोक थोरात यांचे सहकार्य लाभले.
या कार्यक्रमास पोलीस अधीक्षक आर. राजा, जिल्हा शल्यचिकित्सक अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी आर.बी.पवार, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा सरकारी अभियोक्ता अजय राख, जिल्हा वकिल संघ अध्यक्ष दिनेश हंगे, तसेच न्यायालयातील न्यायीक अधिकारी, जिल्हा न्यायालय येथील विधीज्ञ, कर्मचारी यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीमती जे. एस. भाटीया, दिवाणी न्यायाधीश, व. स्तर यांनी केले. व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन हेमंत शं.महाजन, जिल्हा व सत्र न्यायाधीश, बीड यांनी केले.
या कार्यक्रमासाठी आर. बी. मस्के, प्रबंधक, जिल्हा न्यायालय, एस.व्ही.पिंगळे, न्यायालय व्यवस्थापक, एस.डी.कुलकर्णी व न्यायालयीन कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published.