Home » माझा बीड जिल्हा » बोट पलटी आईसह दोन मुलं बुडाली

बोट पलटी आईसह दोन मुलं बुडाली

बोट पलटी आईसह दोन मुलं बुडाली

– डोंगरचा राजा / आँनलाईन

माजलगाव मध्यम प्रकल्पाच्या बॅकवॉटर चे पाणी वाढल्याने ग्रामस्थांना रहदारीसाठी बोटीचा वापर करावा लागत आहे शेतातून घरी येत असताना जोराच्या वार्‍यामुळे बोटीने हेलकावे खल्ले यात पाच जण पाण्यात पडले त्यातील दोघे जण पाण्याबाहेर आले मात्र आईसह दोन मुले पाण्यात बुडालेल्या ची घटना वडवणी तालुक्यातील खळवट लिमगाव येथे घडली आहे.

वडवणी तालुक्यातील खळवट लिमगाव येथे माजलगाव प्रकल्पाच्या बॅक वॉटर ने विळखा घातला आहे धरण शंभर टक्के भरल्याने धरणातील पाणी दूरवर पोहोचले आहे.या गावातील नागरिकांना शेतात जाण्यासाठी बोटचा आधार घ्यावा लागतो आज सायंकाळी पाच जण आपल्या शेतातून गावाकडे बोट मधून येत असताना जोरदार वाऱ्यामुळे बोटीने हेलकावे खाल्ले यात बोटीतील पाच जण पाण्यात पडले त्यातील दोघेजण पाण्याबाहेर येण्यात यशस्वी झाले. मात्र दोन मुले मात्र पाण्यात बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली या घटनेची माहिती कळताच घडवण्याचे तहसीलदार श्री किसन सांगळे मंडळाधिकारी तलाठी पोलिस प्रशासनातील अधिकारी खळवट लिमगाव कडे धाव घेतली.याघटनेत सुषमा भारत फरताडे वय 30 वर्षे आर्यन भारत फरताडे पाच संत यांची भाची वय सात या तिघा जणांचा शोध सुरू आहे. या घटनेने खळवट लिमगाव मध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.