Home » महाराष्ट्र माझा » गावकऱ्यांचा आर्शीवाद,आई वडिलांच्या पुण्याईने यश मिळाले – न्या.दिलिप देशमुख.

गावकऱ्यांचा आर्शीवाद,आई वडिलांच्या पुण्याईने यश मिळाले – न्या.दिलिप देशमुख.

गावकऱ्यांचा आर्शीवाद,आई वडिलांच्या पुण्याईने यश मिळाले – न्या.दिलिप देशमुख.

– गावकऱ्यांच्या प्रेमाने न्याय देवता जेंव्हा गहिवरते..

– देशमुख बंधु म्हणजे प्रामाणिक माणसाचा कारखाना . राम कुलकर्णी

– डोंगरचा राजा / आँनलाईन.

वडवणी – न्यायदेवतेच्या रूपाने काम करत असलेले न्यायाधीश कधी भारावून जातील का ?पण हे खरं आहे की.. तालुक्यातील देवडी गावचे सुपुत्र जिल्हा न्यायाधीश श्री.दिलीप देशमुख यांचं जेव्हा गावकऱ्यांनी अभूतपूर्व स्वागत केलं .तेव्हा ते अक्षरशा गहिवरून गेले. काय बोलावं सुचत नव्हतं .सत्काराला उत्तर देताना त्यांनी सांगितलं ,आम्ही कुठे पण असलो? तरी गावच्या मातीचा सुगंध कधी विसरणार नाही. एक आवाज दिला लगेच धावून येऊ, दरम्यान देशमुख बंधू खऱ्या अर्थाने प्रामाणिक माणसाचा कारखाना असून, सामाजिक जाणीव ठेवत न्यायव्यवस्था आणि पत्रकारिता क्षेत्रात त्यांनी केलेल कर्तुत्व उल्लेखनीय असल्याचे प्रतिपादन भाजपाचे राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केलं.
या गावचे भूमिपुत्र दिलीप देशमुख यांची वाशिमचे मुख्य जिल्हा न्यायाधीश पदी नियुक्ती झाल्याबद्दल व राम कुलकर्णी यांची प्रवक्ता पदी नियुक्ती झाल्याबद्दल, मराठी पत्रकार परिषद आणि ग्रामस्थांच्यावतीने भव्य सत्काराचे आयोजन केले होते. कार्यक्रम स्थळी आगमन होण्या पुर्वी न्यायधिश देशमुख यांचं कोरोना प्रतिबंध सोशल डिस्टनस पाळत गावकऱ्यांनी वाजत गाजत स्वागत केलं. रानूबाई देवी मंदिरात संपन्न झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावचे सरपंच जालिंदर झाटे हे होते .तर व्यासपीठावर गावचे जेष्ठ नागरिक माजी सरपंच माणिकराव देशमुख, भाजपचे राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी, मच्छिंद्र झाटे, सरपंच जालिंदर झाटे, पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष सुभाष चौरे, विभागीय सचिव विशाल साळुंके, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे जिल्हा अध्यक्ष साहस आदोडे, कृषी अभ्यासक शाहीर सर, शेतीनिष्ठ शेतकरी कल्याण कुलकर्णी,प्रा.मगर सर, जिल्हा उपाध्यक्ष सय्यद शाकेर,विश्वास आगे, वडवणी तालुका अध्यक्ष विनायक जाधव, पत्रकार सतिश मुजमुले, धारूर तालूकाध्यक्ष महादेव देशमूख तालूका सचिव आतुल शिनगारे
सह अन्य पत्रकारांची उपस्थिती होती. सुरुवातीला ग्रामस्थांच्यावतीने देशमुख यांचं भव्य स्वागत करण्यात आलं. यावेळी त्यांनी गावातील शाळेसाठी सैनीटाझर मशीन आणि पाचशे वह्या देऊ केल्या. प्रास्ताविकपर भाषणात मच्छिंद्र झाटे म्हणाले आम्हाला देशमुख बंधुचा स्वाभिमान वाटतो. आमच्या गावातून नामांकित पत्रकार, न्यायाधीश असल्याचाही आनंद आहे. या वेळी सत्काराला उत्तर देताना न्यायमूर्ती श्री.दिलीप देशमुख म्हणाले गावकऱ्यांचं प्रेम पाहून मी भारावून गेलो. गावचा आशीर्वाद आणि आई वडिलांची पुण्याई यामुळे जीवनात नेहमीच यश मिळाले .मागे वळून पाहताना केलेले कष्ट आणि आमच्यासाठी आई-वडिलांनी पाहिलेले स्वप्न साकार झाल्याचा आनंद वाटतो. सामाजिक जाणीव ठेवून आम्ही काम करतो .गावासाठी जेवढ चांगलं काम करणे शक्य त्या साठी नेहमीच पुढे राहू. भविष्यात गरज पडेल तेव्हा मला बोलवा मदतीला आल्याशिवाय राहणार नाही. याच कार्यक्रमात राम कुलकर्णी यांनी सांगितले गाव खेड्यातले प्रेम वेगळ असतं.आपलं लेकरू मोठं झालं त्याचा गावकऱ्यांना आनंद असतो. देशमुख बंधू आदर्श कुटुंब असून न्यायव्यवस्थेत दिलीप देशमुख यांचं नाव आणि त्यांनी जोपासलेलं पावित्र्य उल्लेखनीय आहे. तर एस. एम.देशमुख सारखे पत्रकार महाराष्ट्रात आमचे नेतृत्व करतात याचा आम्हाला अभिमान वाटतो. निस्वार्थ सामाजिक सेवा करणारे व्यक्तिमत्त्व म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो. भावाची निवड न्यायाधीशपदी झाल्यानंतर मोठा भाऊ त्यांचा सत्कार करतो? आजच्या कुटुंब व्यवस्थेत नोंद घेण्यासारख उदाहरण असल्याचे त्यांनी सांगितलं. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी पत्रकार परिषदेचे राज्य प्रसिध्दी प्रमुख अनिल महाजन यांनी तर उपस्थित प्रमुख अतिथींचं आभार संपादक अनिल वाघमारे यांनी व्यक्त केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावातील जेष्ठ नागरिक नारायण झाटे,तुळशिराम राऊत,लक्ष्मण झाटे, बाबासाहेब झाटे,विश्वनाथ झाटे, गोरखनाथ पैठणे,परमेश्वर राऊत, परमेश्वर झाटे,गितेश आगे, बाबुराव झाटे सह आदी गावांतील नागरिकांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published.