Home » माझी वडवणी » आ.प्रकाश सोळंके यांनी क्रिडांगणा संदर्भात घेतली बैठक

आ.प्रकाश सोळंके यांनी क्रिडांगणा संदर्भात घेतली बैठक

आ.प्रकाश सोळंके यांनी क्रिडांगणा संदर्भात घेतली बैठक

– डोंगरचा राजा / आँनलाईन.

वडवणी – माजलगांव मतदार संघाचे आमदार प्रकाशदादा सोळंके यांनी वडवणी तालुक्याला नवीन क्रिंडागंण तयार करण्यासाठी काल शुक्रवार रोजी तहसील कार्यालयात तहसीलदार, क्रिडाधिकारी सर्व अधिकारी यांची महत्वपूर्ण बैठक घेऊन नवीन क्रिडागंण करण्यासाठी वडवणी जवळील जागेची पहाणी केली . वडवणी तालुक्यात विविध शासकिय कार्यालय आहेत पण तालुका क्रिडाधिकारी यांचे कार्यालय व क्रिडागंणासाठी प्रस्त मोठया प्रमाणात जागा आवश्यक आहे त्यासाठी काल दि.16 आक्टोंबर रोजी वडवणी तहसिल कार्यालय येथे आ.प्रकाश सोळंके यांनी तहसिलदार,नगरपंचायतचे सिओ, गटशिक्षाणाधिकारी, बांधकाम विभागाचे अधिकारी, यांची महत्त्वपुर्ण बैठक घेतली यावेळी वडवणी नगरपंचायत अंतर्गत अंदाज पञकामध्ये जुन्या नळ धारकासाठी तरतुद का नाही असे विचारले तरतुद नसेल तर २२००/ रु.पेक्षा कमी पैसे घ्या असे सांगितले व कायदेशिर बाबीची पुर्तता करा असे ही आमदार सोळंके यांनी सांगितले, त्यानंतर वार्डात नळ पाईपलाईन झाल्याने रस्ते पूर्ण खराब झाले आहेत ते ही सिमेंट रस्ते दुरूस्त करा असेही म्हटले यावेळी नगरसेवक आळणे, नहार, बडे, कुरेशी, यांनी शहरातील विविध प्रश्न उपस्थित केले.तसेच वडवणी तालुका वकिल संघाने नवीन कोर्ट इमारती मधील लाईट व फर्निचर टेंडर संदर्भात निवेदन दिले त्यानंतर नवीन कोर्ट इमारती मध्ये लाईट व फर्निचरचे टेंडर तात्काळ काढा असे ही संबंधीत अधिकाऱ्यांना आमदार सोळंके यांनी आदेश दिले, त्या नंतर नियोजित तालुका क्रिडांगणासाठी जागेची पहाणी करण्यासाठी आ.सोळंके सोबत माजी सरपंच गंपू पवार,पंजाबराव शिंदे, विनोदकुमार नहार,संभाजी शिंदे,नवनाथ म्हेत्रे,दिनेश मस्के,बजरंग साबळे,सतिष बडे,लक्ष्मणराव आळणे,अस्लम कुरेशी, विठ्ठल भुजबळ,भास्कर उजगरे, श्रीराम मुंडे,संतोष पवार,लहु टकले,दत्ता करांडे, संतोष कदम,सुभाष सावंत,बंटी गायकवाड, इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.