Home » माझा बीड जिल्हा » आठवडी बाजारसह काही बाबींना परवानगी-जिल्हाधिकारी राहूल रेखावार

आठवडी बाजारसह काही बाबींना परवानगी-जिल्हाधिकारी राहूल रेखावार

आठवडी बाजारसह काही बाबींना परवानगी-जिल्हाधिकारी राहूल रेखावार

– डोंगरचा राजा / आँनलाईन

– कन्टेनमेंट झोन वगळता जिल्ह्यातील इतर क्षेत्रात अभ्यासिका, पार्क, आठवडी बाजारसह काही बाबींना परवानगी-जिल्हाधिकारी राहूल रेखावार

बीड,दि. 15 जिल्ह्यात कन्टेनमेंट झोन वगळता जिल्ह्यातील इतर क्षेत्रात अभ्यासिका,पार्क, आठवडी बाजारसह काही बाबीनां अटी व शर्तीसह आजपासून परवानगी देण्यात आली आहे. तसेच यापूर्वी परवानगी असणाऱ्या सर्व व्यवसाय, दुकान, बाबींना रात्री 9 वाजेपर्यंत कामकाज करता येईल. बंदी आदेशातून सुट दिलेल्या सर्व सेवा व आस्थापनामध्ये वावरणाऱ्या सर्व व्यक्तींनी पूर्ण वेळ मास्क, सॅनिटायझर व सुरक्षित अंतर इत्यादी कोविड-19 विषयक सर्व बंधने पाळणे आवश्यक आहे,असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडधिकारी राहूल रेखावार यांना दिले आहेत.
बीड जिल्हयात दिनांक 31 ऑक्टोबर 2020 राजी रात्री 12.00 वा. पर्यंत फौजदारी प्रक्रिया दंड संहिताचे कलम 144 (1)(3) अन्वये मनाई,जमावबंदी आदेश लागू करण्यात आले असून आज जे आदेश लागू आहेत ते आदेश दिनांक 31 ऑक्टोबर 2020 पर्यंत लागू राहतील. तसेच राज्य शासन यांचे प्राप्त आदेशानुसार खालील प्रमाणे आदेश देण्यात येत आहेत.
*कंटेन्टमेंट झोन क्षेत्राबाहेरील भागात खालीलप्रमाणे विविध बाबींना परवानगी असेल* :-
सर्व शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण, शिकवणी देणाऱ्या संस्था इत्यादी 31ऑक्टोबर 2020 पर्यंत बंद राहतील. तथापि ऑनलाईन, दुरस्थ शिक्षणास परवानगी असेल. दिनांक 15 ऑक्टोबर 2020 पासून कंन्टेनमेंट झोन बाहेरील शाळांमध्ये अध्यापक वर्ग व अध्यापकां व्यतिरिक्त कर्मचारी यांची कोणत्याही वेळी 50 टक्के उपस्थिती ऑनलाईन शिक्षण व तत्सम कामासाठी अनुज्ञेय असेल. या संदर्भात आरोग्य व सुरक्षा विषयक नियमांचे पालन करण्यासंदर्भात शिक्षण विभागातर्फे नियमावली जारी करण्यात येईल. दिनांक 15 ऑक्टोबर 2020 पासून औद्यगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये तसेच राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ, राज्य कौशल्य विकास मिशन, केंद्र किंवा राज्य शासन यांच्याकडे नोंदणी केलेल्या सर्व अल्प मुदतीच्या प्रशिक्षण केंद्रांना प्रशिक्षण देण्यास परवानगी असेल. या संदर्भात आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय यांनी निर्गमित केलेल्या नियमावलीचे पालन करावे.
उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये ऑनलाईन,दुरस्थ शिक्षण चालू ठेवता येईल, परंतू उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये पी.एच.डी तसेच विज्ञान व तांत्रिक शाखेतील पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी ज्यांना प्रयोग शाळांची आवश्यकता आहे. अशा संस्था सुरु करण्यासाठी दिनांक 15 ऑक्टोबर 2020 रोजी पासून परवानगी असेल. या संदर्भात उच्च व तांत्रिक शिक्षण विभागातर्फे नियमावली निर्गमित करण्यात येईल. ज्या उच्च शिक्षण संस्थांना केंद्र शासनाचे अर्थसहाय्य मिळते अशा संस्थेच्या प्रमुखांनी या संदर्भात खात्री करावी. इतर सर्व उच्च शैक्षणिक संस्था उदा. राज्य विद्यापीठ, खाजगी विद्यापीठ यांना वरील प्रमाणे परवानगी असेल.
दिनांक 15 ऑक्टोबर 2020 पासून सर्व शासकीय व खाजगी ग्रंथालय व अभ्यासिका यांना कोविड-19 विषयक नियम व सामाजिक अंतर व स्वच्छतेचे पालन करुन उघडण्यास परवानगी असेल, या संदर्भात उच्च व तांत्रिक शिक्षण विभागातर्फे नियमावली निर्गमित करण्यात येईल. गार्डन, पार्क व इतर सार्वजनिक खुली ठिकाणे चालू राहतील. दिनांक 15 ऑक्टोबर 2020 पासून कन्टेनमेंट क्षेत्रा बाहेर केवळ व्यावसायिकांशी संबंधित प्रदर्शने चालू करणेस परवानगी असेल. त्या संदर्भात उद्योग विभागातर्फे नियमावली जाहीर करण्यात येईल.
जिल्हयातील कन्टेनमेंट क्षेत्रा बाहेर स्थानिक आठवडी बाजार (जनावरांचे ) सुरु करण्यास 15 ऑक्टोबर 2020 पासून परवानगी राहील. या संदर्भात (यासाठीचे निर्देश परिशिष्ट अ मध्ये जोडलेले आहेत) परवानगी असणाऱ्या सर्व व्यवसाय, दुकान, बाबींना रात्री 9.00 वा. पर्यंत कामकाज करता येईल. रेल्वे स्थानकांवर होणारी कोविड-19 विषयक वैद्यकीय तपासणी यापुढे करण्यात येणार नाही. यापूर्वी परवानगी देण्यात आलेल्या क्रिया,बाबी नमून दिलेल्या मार्गदर्शक सूचना प्रमाणे चालू राहतील.

*कंटेन्टमेंट झोन* मध्ये दिनांक 19 मे 2020 व दिनांक 21 मे 2020 नुसार जिल्हयामध्ये तयार करण्यात येत असलेले कंटेन्टमेंट झोन हे पुढील आदेशापर्यंत कायम राहतील. केंद्र शासन व राज्य शासनाने वेळोवेळी कंटेन्टमेंट झोन तयार करणेविषयी दिलेल्या सर्व सुचना या पुढील आदेशापर्यंत कायम राहतील.राज्य शासनाने कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 दिनांक 13 मार्च 2020 पासून लागू करुन खंड 2,3 व 4 मधील तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे. आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 25 अन्वये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन करण्यात आलेली आहे व त्यातील पोट कलम 2(अ) नुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हादंउाधिकारी हे उक्त प्राधिकरणाचे पदसिध्द अध्यक्ष आहेत.
या कार्यालयाचे संदर्भीय आदेश क्रमांक 37 अन्वये बीड जिल्हयात फौजदारी प्रक्रिया संहितोच कमल 144 (1)(3) अन्वये दिनांक 31 ऑक्टोबर रोजीचे रात्री 12.00 वा. पर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत. यापूर्वी वेळोवेळी परवानगी दिलेल्या बाबी, क्षेत्रे पुर्ववत सुरु राहतील आणि यापूर्वी दिलेले आदेश सदर आदेशास संलग्न राहतील आणि सदरचे आदेश दिनांक 31 ऑक्टोबर 2020 पर्यंत अस्तित्वात राहतील.
*-*-*-*-*-*-*-*

Leave a Reply

Your email address will not be published.