सभापती संभाजी शेजुळ यांनी भूमिपूजनाने केली कामकाजाला सुरुवात.
– डोंगरचा राजा / आँनलाईन.
– नवीन मोढयाला भेट देऊन केली पाहणी.
माजलगाव – बाजार समितीचे सभापती संभाजी शेजुळ यांनी नवा मोंढा फुले पिंपळगाव येथे आडत व्यापारी, शेतकरी,हमाल, मापाडी, मुनिम या सर्व बाजार घटकांसाठी आमदार प्रकाश दादा सोळंके यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक 8 ऑक्टोबर रोजी सुलभ शौचालया च्या जागेचे भूमिपूजन करत कामकाजाला सुरुवात केली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपसभापती अच्युतराव लाटे हे उपस्थित होते.
या पूर्वी बऱ्याच दिवसापासून या सर्व बाजार घटकांना उघड्यावर शौचास जावे लागत होते ही बाब लक्षात येताच त्यांनी आपल्या कामाची सुरुवातच सुलभ शौचालयाच्या जागेच्या भूमी पूजनाने करण्याचा निर्णय घेतला व भूमिपूजन झाल्याबरोबर त्यांनी नवीन मोंढ्यात पायी फिरत सर्व मोढयाची पाहणी केली यावेळी त्यांच्या समवेत संचालक अनंतराव सोळंके, पांडुरंग वगरे, प्रभाकरराव होके, सुहासराव सोळंके, आगे ,सचिव एच.एन. सवणे,बंडू ईके,बाळासाहेब पवार यांच्यासह शेतकरी, व्यापारी, हमाल कर्मचारी उपस्थित होते.