Home » माझी वडवणी » धनगर आरक्षणासाठी तहसीलवर सरकार जगाओ आंदोलन

धनगर आरक्षणासाठी तहसीलवर सरकार जगाओ आंदोलन

धनगर आरक्षणासाठी तहसीलवर सरकार जगाओ आंदोलन

– डोंगरचा राजा आँनलाईन. 

– तहसिलवर धनगर आरक्षणासाठी ढोल बजाओ,सरकार जगाओ आंदोलन.

वडवणी – धनगर समाजाला एस.टी.प्रवर्गात समावेश तातडीने करण्यात यावा यासह अन्य मागण्यासाठी व सरकारला झोंपेतून उठविण्यासाठी आज धनगर समाजाच्या वतीने  वडवणी तहसिल कार्यालयावर ढोल बजावो सरकार जगाओ आंदोलन करण्यात आले.

गेल्या ७० वर्षांपासून धनगर समाजाला आपल्या हक्काच्या अनुसूचित जमातीच्या आरक्षणापासून वंचित ठेवण्यात आलेले आहे.आजवर विविध राजकीय पक्षांनी धनगर समाजाची फसवणूक केलेली आहे.म्हणुनच धनगर समाज संघर्ष समिती व वडवणी तालुका आरक्षण कृती समिती यांच्यावतीने वडवणी तहसील समोर आंदोलन करण्यात आले.तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनात प्रामुख्याने लवकरात लवकर धनगर समाजाला एस.टी प्रभागाचा दाखला देण्यात यावा,समाजाची एस.टी प्रवर्गासाठी न्यायालयात चालू असलेल्या याचिकेला सरकारच्या वतीने चांगल्या व अनुभवी वकिलाची नेमणूक करण्यात यावी,याचिका जलद गतीने कोर्टात चालवावी, मागील सरकारने ज्या आदिवासींना ते धनगर समाजाला या तत्त्वावर दिलेले एक हजार कोटीचे पॅकेज द्यावे, विद्यार्थ्यांसाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयम योजना धनगर समाजासाठी कार्यरत करावी यासह इतर मागण्यांचे निवेदन वडवणी तहसीलदार यांना देण्यात आले आहे. सदर आंदोलन हे शहाजी लोकरे व दत्तात्रय वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले आहे.यावेळी बद्रिनाथ व्हरकटे,महादेव सातपुते,आकाश परबळे,अनंत काळे,लहु गवळी,बलवंत गायकवाड,नवनाथ तुरे,दिलीप चोरमले,ज्ञानोबा परबळे,बिरुदेव चौरे,नामदेव सातपुते,मनोज परबळे,बबन वंजीर,किरण लोकरे,प्रकाश वंजीर,पांडुरंग चौरे,बंडू वंजीर,कारभारी गायकवाड,शिवम लोकरे,अर्जुन गायकवाड,सुरेश गायकवाड यांच्यासह धनगर समाज बांधव सहभागी झाला होता.

Leave a Reply

Your email address will not be published.