एस.पी.हर्ष पोद्दार यांना दिल्या शुभेच्छा – अँड.अजित देशमुख
– डोगरचा राजा / आँनलाईन.
बीड – गेल्या सव्वा वर्षापासून कार्यरत असलेले पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांची बदली झाल्याने त्यांची भेट घेऊन त्यांच्या भावी कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे लिखित “अनुभवाचे बोल” आणि आणखी एक पुस्तक साहेबांना भेट देऊन जन आंदोलनात तर्फे निरोप देण्यात आला.
अँड.अजित देशमुख यांनी आज मावळते एस. पी. हर्ष पोद्दार यांची भेट घेतली. काही मुद्द्यांवर यावेळी चर्चा करण्यात आली. पोद्दार यांनी कोरोना काळामध्ये अत्यंत चांगली कामगिरी बजावली. त्यात त्यांनी पोलिसांसाठी देखील योग्य ती खबरदारी घेतली. एकीकडे कोरोणाला जग घाबरत असताना आपत्कालीन परिस्थिती हाताळणी सोपे नसते. मात्र या काळात आणि यापूर्वीच्या काळात देखील काही कारवाया करण्यात आल्या. त्यामुळे पोलिसांना यश आले.
दरम्यान, दप्तर दिरंगाई आणि बदल्याचा कायदा, २००५ मध्ये अधिकाऱ्यांच्या बदल्या किती काळानंतर कराव्यात, हे ठरलेले आहे. सरकारने अशा तातडीने आणि अनावश्यक बदल्या करून हा कायदा मोडीत काढला आहे. त्यामुळे देशमुख यांनी सरकारच्या अशा धोरणा विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.