Home » माझी वडवणी » आ.सुरेश धस यांच्यावरील गुन्हा तात्काळ मागे घेण्यात यावा – भारत जगताप.

आ.सुरेश धस यांच्यावरील गुन्हा तात्काळ मागे घेण्यात यावा – भारत जगताप.

आ.सुरेश धस यांच्यावरील गुन्हा तात्काळ मागे घेण्यात यावा – भारत जगताप.

– डोंगरचा राजा / आँनलाईन.

– तहसीलदार वडवणी यांना दिले लेखी निवेदन 

वडवणी – ऊसतोड मजुरांची वाहने अडविल्याप्रकरणी विधान परिषदेचे दबंग आमदार आ.सुरेश आण्णा धस यांच्यावर गुन्हा दाखल करीत त्यांना अटक करण्यात आली असल्याचे समजते. याचा तीव्र निषेध करीत आ.सुरेश आण्णा धस यांच्यावरील गुन्हा तात्काळ मागे घेण्यात यावा अशी मागणी वडवणी येथील आ.सुरेश आण्णा धस मित्रमंडळाचे युवा नेते भारत दादा जगताप यांनी तहसीलदार वडवणी यांना दिलेल्या लेखी निवेदनाव्दारे केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, ऊसतोड मजुरांच्या न्याय व हक्कासाठी दिवस-रात्र रस्त्यावर उतरून रात्री-अपरात्री त्यांच्या मदतीसाठी धावून जाणारा निधड्या छातीचा एकमेव नेता आ.सुरेश आण्णा धस हे असून त्यांच्या या जनसेवेला कोंडीत पकडण्यासाठी निष्क्रिय सरकार विविध दबावतंत्राचा वापर करत आहेत. आ.सुरेश आण्णा धस व त्यांच्या समर्थकांनी मिरजगावहून पुढे पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्यांकडे जाणारी वाहने अडविली व ऊसतोड मजुरांच्या न्याय व हक्कासाठी सध्या कारखाना स्थलांतर थांबवावे या हेतूने ही वाहने अडविण्यात आली होती. दरम्यान वाहने अडविलेले मजूर हे धुळे व नंदुरबार जिल्ह्यातून दूरचा प्रवास करून आले होते. सकाळच्या वेळी मजुरांची वाहने अडवून आष्टीत आणल्यानंतर आमदार धस यांच्या सूचनेप्रमाणे सर्व मजुरांची चहा नाष्ट्याची व्यवस्था करण्यात आली. तसेच दुपारपर्यंत मजूर येथेच असल्याने दुपारचेही जेवण सर्वांना येथेच्छपणे देण्यात आले. मजुरांची कोणतीही आबाळ होऊ नये याची पुरेपूर दक्षता घेण्यात आली व सर्व मजूर आनंदाने आपल्या घरी परतले. एवढे सगळे होवूनही निष्क्रिय सरकारच्या पोटात दुखू लागल्याने त्यांनी व्देषापोटी आ.सुरेश आण्णा धस यांच्यावर गुन्हे दाखल केले व काल बुधवार रोजी त्यांना याप्रकरणी अटकही करण्यात आले असल्याचे समजते. हे सर्व प्रकार खूपच निषेधार्ह असून याचा तीव्र निषेध करीत आ.सुरेश आण्णा धस यांच्यावरील गुन्हा तात्काळ मागे घेण्यात यावा अशी मागणी वडवणी येथील आ.सुरेश आण्णा धस मित्र मंडळाचे युवा नेते भारत दादा जगताप यांनी तहसीलदार वडवणी यांना दिलेल्या लेखी निवेदनाव्दारे केली आहे. यावेळी पुसरा येथील सरपंच हरी पवार, मोहनदादा जगताप मित्रमंडळाचे तालुकाध्यक्ष बंडू नाईकवाडे, शांतीलाल पवार यांसह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.