Home » माझा बीड जिल्हा » बीड वासियांनो..पुन्हा लॉकडाऊनची वेळ आणू नका – अँड.अजित देशमुख

बीड वासियांनो..पुन्हा लॉकडाऊनची वेळ आणू नका – अँड.अजित देशमुख

बीड वासियांनो..पुन्हा लॉकडाऊनची वेळ आणू नका – अँड.अजित देशमुख

– डोंगरचा राजा / आँनलाईन.

बीड – बीड जिल्ह्यात कोरोणाचे पेशंट दिवसेंदिवस वाढत आहेत. तरीही लोक शिस्त पाळायला तयार नाहीत. सायंकाळी साडेसहा वाजता दुकान बंद करण्याची वेळ आहे. काही भागात दुकाने रात्री आठ वाजले तरी चालू असतात. हे चुकीचे असून वेळ पाळली नाही तर पुन्हा लॉकडाऊनचे परिणाम तुमच्यामुळेच पुन्हा भोगावे लागतील. त्यामुळे जिल्हा वासियांनी शिस्त बाळगावी, असे आवाहन जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित एम. देशमुख यांनी केली आहे.

बीड जिल्ह्यात कोरोणा महामारी सत्र आता मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी लादलेल्या नियमांचे जनता कठोर पालन करताना दिसत नाही. रस्त्यावर अनावश्यक वर्दळ वाढलेली आहे. त्याचप्रमाणे सायंकाळी साडे सहाच्या पुढे संचार बंदी असतानाही घोळकेच्या घोळके रस्त्याने दिसत आहेत. त्यामुळे माणसाच्या वर्तणुकीची हीच मानसिकता कायम राहिली तर बीड जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन करण्याची वेळ येणार आहे.

जोपर्यंत आपल्या नजीक किंवा आपल्या घरात कोरूना पेशंट येत नाही, तोपर्यंत कोरणा पेशंट बाबतचे गांभीर्य कोणालाही नसते. मात्र दुर्दैवाने असा रुग्ण घरात आला तर मात्र त्या घरातले सर्वच हैराण होतात. त्यामुळे जनतेने आत्ताच खबरदारी घ्यावी आणि सर्व नियमांचे पालन करून सायंकाळी साडेसहाच्या पुढे कोणीही रस्त्यावर थांबण्याचा प्रयत्न करू नये.

साडेसहाच्या पुढे पोलिसांनी अथवा कोणी सांगण्यापूर्वी आपली दुकाने बंद करावीत अन्यथा जी दुकाने उघडी दिसतील त्यांचे परवाने प्रशासनाने रद्द करून दुकाने कायमस्वरूपी बंद करावीत. दुकाने आणि हॉटेल उघडे राहिल्यामुळे जनता रस्त्यावर असते. बंदची वेळ पाळली तर जनता आपोआप घरी जाते. शिस्त पालन करून कोरोना रोखा, असे आवाहन अँड. देशमुख यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.