Home » माझी वडवणी » वडवणी तालुक्यातील या गावात कंटेनमेंट झोन घोषित.

वडवणी तालुक्यातील या गावात कंटेनमेंट झोन घोषित.

वडवणी तालुक्यातील या गावात कंटेनमेंट झोन घोषित.

– डोंगरचा राजा / आँनलाईन.

वडवणी – वडवणी शहरातील श्री. लक्ष्मण आळणे,श्री.अशोक कोकणे व मोतीराम महादर यांचे घर आणि तालुक्यातील मौजे देवडी,
चिखलबीड ही संपूर्ण गावे त्याच बरोबर बाहेगव्हाण शाळेसमोरील भाग,पिंपळा अंतर्गत गहीनीनाथ भाग कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आल्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून या ठिकाणी कंटेनमेंट झोन घोषित करुन अनिश्चित कालावधीसाठी फौजदारी प्रक्रिया दंड संहिता १९७३ चे कलम १४४ (१)(३)नुसार पूर्णवेळ संचारबंदी लागू केली आहे असे आदेश अध्यक्ष तालुका आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी श्रीकिशन सांगळे यांनी दिले आहेत.

याबाबतचा आदेशात पुढे म्हटले आहे की,ज्याअर्थी संदर्भीय आदेश क्रमांक 07 अन्वये दिनांक 31 ऑगस्ट 2020 रोजीचे रात्री 12 वाजेपर्यंत फौजदारी प्रक्रिया दंड संहिताचे कलम 144 (1) (3) नुसार संपूर्ण बीड जिल्ह्यात लागू करण्यात आले आहेत.आणि त्याअर्थी दिनांक 05/09/2020 रोजी वडवणी तालुक्यातील कोव्हिड -19 चे रुग्ण आढळून आलेले असून खालील तक्त्यामध्ये नुमुद शहर व गावात यापुढे दिनांक 05/09/2020 रोजी पासुन प्रतिबंधात्मक व्यवस्था अंतर्गत कंटेनमेंट झोन जाहीर करावा असे अहवाल तालुका आरोग्य अधिकारी, मुख्याधिकारी नगरपंचायत वडवणी यांनी संयुक्त अहवाल संदर्भ क्र. 10 अन्वये सादर केला आहे. त्याअर्थी संदर्भीय क्रमांक 09 अन्वये मला प्राप्त अधिकाराचा वापर करून वडवणी शहरात/ तालुक्यात व इतर ठिकाणी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून पुढील प्रमाणे फौजदारी प्रक्रिया दंडासंहिता 1973 चे कलम (1)(3) नुसार खालील तक्त्यामध्ये नमूद गावात / शहरात /परिसरात कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात येत असून पुढील अनिश्चित कालावधीसाठी पूर्णवेळ बंद करण्यात येऊन संचारबंदी लागू करण्यात येत असल्याचे आदेश अध्यक्ष तालुका आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी श्रीकिशन सांगळे यांनी दिले आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published.