Home » ब्रेकिंग न्यूज » जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे कडे मराठी पत्रकार परिषदेची मागणी.?

जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे कडे मराठी पत्रकार परिषदेची मागणी.?

जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे कडे मराठी पत्रकार परिषदेची मागणी.?

– डोंगरचा राजा / आँनलाईन.

पञकार संतोष भोसले यांच्या कुंटूंबास शासकीय मदत करावी व जिल्ह्यात पञकारा साठी कोवीड सेंटर मध्ये स्वंतञ कक्ष करण्याची बीड जिल्हा मराठी पञकार परिषदेची मागणी

बीड – बीड जिल्ह्यातील कोरोना मुळे मृत्यू झालेल्या गेवराई येथील पञकार संतोष भोसलेच्या कुंटूंबास शासनाने जाहीर केल्या नूसार शासकीय मदत द्यावी व जिल्ह्यात सर्व कोवीड सेंटर वर पञकारा साठी स्वतंञ उपचार कक्ष सुरू करावा अशी मागणी बीड जिल्हा मराठी पञकार परिषदेच्या वतीने जिल्हाधीकारी राहूल रेखावार यांचे कडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

सध्या सर्वत्र कोरोना चा प्रादूर्भाव वाढतो आहे. या काळात सुरूवाती पासून जिल्ह्यातील पत्रकार बांधव प्रशासनास सर्वोत्परी सहकार्य करत आहेत. पत्रकारांच्या मागण्या संदर्भात आपण सहानूभुतिपुर्वक विचार करुन त्या मागण्या पुर्ण करावीत असे नमुद करण्यात आले. राज्यात कोरोना मुळे मयत झालेल्या पत्रकारांच्या कुंटूंबाना राज्य शासनाचे घोषणे प्रमाणे 50 लक्ष रुपये मदत द्यावी. पुणे येथील कोरोना मुळे मृत्यू झालेला पञकार पांडूरंग रायकर यांचे मृत्यूस उपचार वेळेवर न मिळाल्याने झाला. यांला दोषी असणाऱ्यावर कारवाई करावी व या प्रकाराची स्वंतञ चौकशी समिती नियूक्त करून चौकशी करावी व दोषीवर कडक कारवाई करावी, बीड जिल्ह्यात सर्व विलगीकरण कक्षात पञकारांसाठी स्वतंञ कोरोना उपचार कक्ष सुरू करावा. गेवराई येथील कोरोना मुळे मृत्यू झालेल्या पञकार संतोष भोसले यांचे कुंटूंबास शासनाची मदत मिळावी. या सर्व मागण्यांचा प्राधान्याने विचार करून पञकारांना न्याय द्यावा असे निवेदन बीड जिल्हा मराठी पञकार परीषदेच्या वतीने जिल्हाधीकारी राहूल रेखावार यांना देण्यात आले. यावेळी रेखावार यांनी मागण्या संबंधात चर्चा केली. या मागण्याचा प्राधन्याने विचार करून वरीष्ठ पातळीवर योग्य अहवाल पाठवला जाईल असे सांगून जिल्ह्यात अॕटीजन टेस्ट करताना सर्व पञकार बांधवानी आपली टेस्ट करून घ्यावी जनता व प्रशासन या मधील महत्वाचा दुवा आहेत असे त्यांनी आवर्जून सांगीतले. यावेळी परीषदेचे राज्य प्रसिध्दीप्रमूख अनिल महाजन यांनी पञकराची भुमिका मांडली. यावेळी दिलेल्या निवेदना वर राज्य प्रसिध्दी प्रमूख अनिल महाजन, जिल्हाध्यक्ष सुभाष चौरे, विभागीय सचिव विशाल सांळूके, जिल्हा सरचिटणीस विलास डोळसे, जिल्हा कार्याध्यक्ष दत्ताञय अंबेकर, राज्य कार्यकारणी सदस्य अनिल वाघमारे, जिल्हा उपाध्यक्ष
सय्यद शाकेर, पञकार हल्ला विरोधी कृती समितीचे जिल्हा निंमञक साहस औदाडे, सोशल मिडीया सेल चे संतोष स्वामी, पञकार संघाचे तालूकाध्यक्ष महादेव देशमूख, तालूका सचिव अतूल शिनगारे, तालूका निमंञक बालाप्रसाद जाजू, हरिभाऊ मोरे, सतिश वाकूडे, राम शेळके, हनूमान बडे, सतिश मुजमुले, ईश्वर खामकर, अतीक मोमीन, सतीश पोतदार, रवि गायसमूद्रे, शेख इरफान, नितीन शिनगारे आदी च्या स्वाक्ष-या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.