गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे बहुजन विकास मोर्चाचे बाबुराव पोटभरे यांनी केली मागणी.
– डोंगरचा राजा / आँनलाईन.
अँट्रासिटी अँक्ट मधील फिर्यादीने कोर्टात म्हणणे मांडू नये म्हणुन दोन दिवसांपुर्वी वडवणी पोलीसांनी फिर्यादीलाच अटक केली आहे.परंतु या प्रकरणात पोलीस जेवढे हुशार असतील त्यापेक्षा हि मी हुशार आहे.दरोड्याचा गुन्हा दाखल करणाऱ्या पोलीसा विरुध्दात अँट्रासिटी अँक्ट नुसार गुन्हा दाखल करावा अशी मागणी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे असून या प्रकरणाला पोलीसच जबाबदार आहेत.असा घणाघाती आरोप बहुजन विकास मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष बाबुराव पोटभरे यांनी पत्रकार परिषेद घेऊन केला आहे.
वडवणी शहरातील भिमनगर येथील रहिवाशी आसणारे सोनाजी उजगरे यांच्या घरावर बाहेगव्हण येथील समाज कंटकांनी हल्ला केला होता.यामध्ये पिडित कुंटुबियावरच बाहेगव्हण येथील आरोपीनी पोलीसांसोबत हात मिळवणी करत दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे.पिडित कुंटुबातील फिर्यादीने कोर्टात म्हणणे मांडेल म्हणुन पोलीसानी सोनाजी उजगरे यांना अटक केली आहे.याच पाश्र्वभुमिवर बहुजन विकास मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष बाबुरावजी पोटभरे यांनी वडवणी येथे पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.यावेळी वडवणीचे माजी सरपंच भिमराव उजगरे,जिल्हाध्यक्ष प्रशांत ससाणे,माजलगांव पं.स.सदस्य मुरलीधर साळवे,माजलगांवचे तालुकाध्यक्ष प्रदिप दरेकर,भालेराव मित्र मंडळाचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब साळवे,ॲड.भास्कर उजगरे,वडवणीचे तालुकाध्यक्ष बाबा वाघमारे,युवा नेते एन.के.उजगरे,राजेश उजगरे यांच्यासह आदि जण उपस्थित होते.
यावेळी पत्रकार परिषेदेमध्ये पुढे बोलताना बाबुराव पोटभरे म्हणाले कि,वडवणी येथील अँट्रासिटी प्रकरणात आम्हाला राजकारण करायचे नाही,हा राजकारणाचा विषय नसून अत्याचाराचा आहे.बाहेगव्हण येथील ३५ ते ४० लोक आले आणि सोनाजी उजगरे यांच्या घरावर हल्ला केला,महिलेच्या अंगावर हात घातले,मारहाण करत घरातील महिला व पुरुषांना जातीवर शिवीगाळ केली,घरातील खाद्य व संसारिक वस्तूची नासधूस केली म्हणुन सोनाजी उजगरे यांनी पोलीसांत अँट्रासिटी अँक्ट नुसार बाहेगव्हण येथील सात आरोपी विरुध्दात गुन्हा दाखल केला परंतु या गुन्ह्याला पर्याय म्हणुन पोलीसांना हाताशी धरुन उजगरे कुंटुबियावर दरोड्याचा गुन्हा दाखल केला आसून याचं कुंटुबियात एक अंपग व व्यवस्थितपणे चालता,बोलता ही येत नसणाऱ्या व्यक्तीवर हि गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फिर्यादी सोनाजी उजगरे सतत म्हणत होता.माझ्या घरावर ३५ ते ४० लोकांनी हल्ला केला आहे.या प्रकरणाला जातीय रंग येऊ द्याचा नव्हता म्हणुन मुख्य आरोपीला कठोर शासन व्हावे व त्यांच्यावरच गुन्हा दाखल व्हावा म्हणुन त्याचं लोकांविरुध्दात गुन्हा दाखल झाला पाहिजे म्हणुन अग्रही होतो.परंतु बाहेगव्हण येथीलच लोकांनी पोलीसांना हाताशी धरुन उजगरे यांच्या कुंटुबियाविरुध्दात दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणात माजलगांव उपविभागीय पोलीस आधिकारी डिसले व पोलीस अधिक्षक पोतदार यांच्या समोर किफायत मांडल्यानंतर आम्हाला योग्य ते मार्गदर्शन मिळाले परंतु आज अँट्रासिटी प्रकरणातील आरोपी माजलगांव न्यायलयात जमिन मांडणार असल्याने फिर्यादी सोनाजी उजगरे यांनी कोर्टात म्हाणणे मांडु नये म्हणुन वडवणी पोलीसांनी दोन दिवसांपुर्वीच सोनाजी उजगरे यांना दरोड्याच्या गुन्ह्यात अटक केली आहे.या प्रकरणात जेवढे पोलीस हुशारी दाखवत आसतील तर मी हि अशा गुन्हात त्यांच्या पेक्षा हुशार आहे.आजच सोनाजी उजगरे यांच्या पत्नीला कोर्टात आरोपी विरुध्दात शपथपत्र दाखल केले आहे.यात त्यांनी आरोपी सुटले तर आमच्या कुंटुबियांना धोका निर्माण होऊ शकतो,जिवितास बरे वाईट होऊ शकते अशा स्पष्ट उल्लेख न्यायलयात दिलेल्या शपथपत्रात केला आहे.तर हे प्रकरण जातीचे नसून अत्याचाराचे आणि अन्यायाचे आहे.कोण कोणाच्या पाठीशी आहे मला माहित नाही परंतु मी पिडित उजगरे यांच्या कुंटुबियांच्या पाठिशी आहे हे जाहिरपणे सांगतो.अन्याय कोणावर होवो,तो कोणत्या हि समाजाचा असो मी त्यांच्या बाजूनेच असेल यात तिळमात्र शंका नाही,या प्रकरणात हि तसेच आहे.संध्याकाळी हा प्रकार घडल्या नंतर उजगरे यांचे कुंटुब पोलीस स्टेशनमध्ये रात्रभर होते.कुंटुबातील एक व्यक्ती अंपग आहे त्याला चालता येत नाही तो कसा दरोडा टाकू शकतो? असा प्रश्न उपस्थित करत अँट्रासिटी अँक्ट या गुन्ह्याला पर्याय म्हणुन पोलीसांनीच उजगरे कुंटुबियावर दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे.याला पोलीसच जबाबदार आहेत.त्यामुळे पोलासाविरुध्दात हि अँट्रासिटी अँक्ट नुसार गुन्हा दाखल करावा अशी मागणी राज्याचे गृहमंञी अनिल देशमुख,पोलीस अधिक्षक हर्ष पोतदार व माजलगांव उपविभागीय पोलीस आधिकारी श्रीकांत डिसले यांच्याकडे आहे.अशी माहिती पत्रकार परिषेदेमध्ये बहुजन विकास मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष बाबुराव पोटभरे यांनी माहिती देत पोलीसांवर हि हल्लाबोल केला आहे.