सभापती अशोक डक यांचा सन्मान
-डोंगरचा राजा / आँनलाईन.
– राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सभापती अशोक डक यांचा सन्मान
प्रकाशदादांच्या आशिर्वादानेच सभापती झालो : अशोक डक
माजलगाव : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी अशोक डक यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल आमदार प्रकाश सोळंके यांच्या केसापुरी कॅम्प येथील निवासस्थानी गुरूवार दि.03 रोजी दुपारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी आमदार प्रकाश सोळंके यांची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान, या सत्कार समारंभात सभापती अशोक डक यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आमदार प्रकाशदादा सोळंके यांच्या आशिर्वादानेच सभापतीपद मिळाले असल्याचे ते म्हणाले.
या सत्कार समारंभात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष रमेश सोळंके, जि.प.सदस्य चंद्रकांत शेजुळ, सभापती भागवतराव खुळे, उपसभापती डाॅ.वसिम मनसबदार, जयदत्त नरवडे, रामेश्वर टवाणी, उमाकांत सोळंके, पं.स.सदस्य मिलिंद लगाडे, चंद्रकांत वानखेडे, वैजनाथ जाधव, नगरसेवक शेख मंजूर, विजय शिंदे, रोहन घाडगे, नासेर खान पठाण, खलिल पटेल आदींची उपस्थिती होती. यावेळी आमदार प्रकाश सोळंके म्हणाले की, अबांना सभापती पदाची मिळण्यासाठी प्रयत्न केले आणि त्यात यशही आले. एवढे मोठे पद मिळविण्यासाठी ते नशीबवान असल्याचेही आमदार सोळंके म्हणाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार विश्वांभर थावरे यांनी मानले. या सत्कार समारंभाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख नेते, कार्यकर्त्यांचा सहभाग होता.