Home » ब्रेकिंग न्यूज » माझी नेमणूक करु नये – बाबरी

माझी नेमणूक करु नये – बाबरी

माझी नेमणूक करु नये – बाबरी

– डोंगरचा राजा / आँनलाईन

भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष पद नुकतेच बाबरी उर्फ फुलचंद मुंडे यांना पक्षाच्या वतीने देण्यात आले होते.मात्र पद जाहीर होताच काही तासांतच बाबरी मुंडे यांनी सदर पदावर माझी नेमणूक करु नये असे कळविल्याने उलट सुलट चर्चा रंगवली जात आहे.तर बाबरी मुंडे यांनी कुटुंबात अनेक पदे असल्याने व कौटुंबिक कामात व्यस्त असल्याने मी सदर पदावर इतर कोणीही घ्या असे जिल्हाध्यक्ष यांना लेखी कळविले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, वडवणी शहर व माजलगाव विधानसभा मतदारसंघात सर्व परिचित असणारे युवा व्यक्तीमत्व अनेकांच्या अडचणीत सदैव तत्पर असणारे जिल्हा सहकारी बँकेचे संचालक युवा नेते बाबरी उर्फ फुलचंद मुंडे यांना भारतीय जनता पक्षाचे वतीने नुकतेच बीड जिल्हा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे उपाध्यक्ष पद जाहीर केले होते.या निवडी संदर्भात अनेकांनी त्याचे फोन व्दारे व सोशल मीडिया च्या माध्यमातून अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.मात्र सदर निवडी बद्दल मला कसलीही माहिती नाही.तुम्ही शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी आभार मानतो.परंतु माझे कुटुंबात पक्षाचे व पक्षा अंतर्गतचे अनेक पदे असल्याने माझी या पदावर नेमणूक करु नये . असे भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या कडे लेखी राजीनामा दिला आहे.ते पुढे म्हणाले की, मला पार्टी ने पद देऊन सन्मान केला त्याबद्दल मी ताईसाहेंबाचा व भारतीय जनता पार्टीचा आभारी आहे. पण माझ्या कडे माझ्या घरात जनतेने निवडून दिलेले भरपुर पद आहेत. त्यामुळे मी सध्या या पदाला वेळ देऊ शकत नाही तरी पार्टीला विनंती करतो की, मला दिलेले जिल्हा उपाध्यक्ष पद पार्टीतील दुसर्‍या कार्यकर्त्याला द्यावे
जेनेकरुन पार्टीला फायदा होईल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.